आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
आहुर्ली (प्रतिनिधी): (नवनाथ अर्जुन पा. गायकर यांजकडून) ईगतपुरी तालुक्यातील कोरपगाव येथे सहा वर्षापुर्वी तत्कालीन जि.प.सदस्य गोरख बोडके यांच्या अथक प्रयत्नातून मंजुर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सदयस्थितीत सुसज्ज झालेली असुन, येथे कुशल,अकुशल कर्मचारी नियुक्ती अभावी अदयाप आरोग्य केंद्र कार्यरत झालेले नाही. या पाश्वर्भुमीवर राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी सदर ठिकाणी कर्मचारी नियुक्ती करुन सदरील आरोग्य केंद्र तातडीने कार्यान्वित व्हावे यासाठी पावले उचलावी, अशा मागणीचे साकडे माजी जि.प.सदस्य तथा ईगतपुरी-त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गोरख बोडके यांनी मंत्री महोदयानां घातले आहे.
दरम्यान चर्चेअंती राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी सदरील आरोग्य केंद्र तातडीने कार्यान्वित करु असे ठोस आश्वासन दिले असल्याची माहिती बोडके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
ईगतपुरी तालुक्यातील कोरपगाव हे गाव व परिसर हा बहुसंख्याक आदिवासीबहुल आहे. मात्र या ठिकाणी आरोग्य व्यवसथेबाबत तीव्र गैरसोय होती. या परिसरातील ही आरोग्य कुचंबणा लक्षात घेऊन तत्कालीन जि.प.सदस्य गोरख बोडके यांनी अथक प्रयत्नातून येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले होते. व त्यानंतर या ठिकाणी आज सुसज्ज अशी इमारत ही आकारास आली आहे. विशेष म्हंणजे कोरोना महामारीच्या पाश्वर्भुमीवर याच ईमारतीत कोविड सेंटर ची तात्पुरती उभारणी करून अनेक कोरोना बाधितांवर उपचार केले गेले होते.
दरम्यान इमारत पुर्णत्वानंतर कुशल व अकुशल कर्मचारी नियुक्ती ची या प्रा.आ.केंद्रास आता प्रतिक्षा आहे.सदर केंद्राच्या कार्यान्वित होण्यानंतर या परिसरातील आदिवासी बांधवाची मोठ्या प्रमाणात आरोग्य समस्या दुर होणार आहे. बोडके यांनी याच मागणी साठी राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांची भेट घेऊन या मागणीचे साकडे घातले. यावेळी त्यांचे समवेत माजी आमदार जयंत जाधव , जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार ,नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड ,युवक जिल्हाध्यक्ष पुरषोत्तम कडलक आदी पदाधिकारी ही उपस्थित होते.
यावेळी ना.टोपे यांनी मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला असुन राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आरोग्याच्या प्रश्नावर अत्यंत जागरुक असुन तातडीने हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे सकारात्मक व ठोस आश्वासन दिले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...