Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपन्यात खाकी जिं...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपन्यात खाकी जिंकली…!!

कोरपन्यात खाकी जिंकली…!!

कोरपना : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि इकडे कोरपना शहरात राजकारणाचे वारे वाहून वातावरण तापायला लागले. दरम्यान शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने मोठ्या ताकदीने आपले कार्य पार पाडताना दिसले आहे. यामुळे कोरपना शहरातील पोलीस प्रशासनाबद्दल एक चांगली प्रतिमा बनल्याचे चित्र दिसून येत आहे.

आताच विधान परिषद निवडणुका पार पडत असताना दिनांक 30 नोव्हेंबर 2021 ला राज्यातील 106 नगरपंचायती आणि अनेक विविध निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर झाला आणि अवघ्या महाराष्ट्रात राजकारणाची सत्ताकारणाची वारे पुन्हा एकदा वाहू लागली. पोलीस प्रशासन पुन्हा एकदा आपल्या ॲक्शन मोडमध्ये येऊन आपली कामगिरी बजावण्यात सक्षम व सजग झाले असंच काहीसं वातावरण कोरपना शहरात बघायला मिळाले. राजकीय वादाचा टोळी-युद्धांचा, गटा-गटांची राजकारण आणि संघर्षाचा पूर्व इतिहास असलेल्या कोरपना नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.

अशा या नगरपंचायतीची आणि तिथल्या वातावरणाचा आवाका लक्षात घेता पोलिस प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता निष्पक्ष, शांततेत आणि चोखपणे पार पाडण्याचा चंग बांधूनच कामाला लागली. निवडणूक प्रक्रियेच्या अगदी पहिल्या दिवसापासून पोलीस प्रशासन चोख बंदोबस्तात उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरून घेणे, त्यांच्या अर्ज चाचणीदरम्यान कुठलाही गोंधळ होऊ नये इत्यादी. प्रक्रियांमध्ये कायम सजग राहिले.
प्रचारादरम्यानही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन दक्ष राहून सर्व प्रकारांवर लक्ष ठेवून होते. दिवसभर गावात, मुख्य ठिकाणी पोलिसांची उपस्थिती, रात्री 10 वाजेनंतर पेट्रोलिंग, असे अनेक उपाय करून निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान सक्षमपणे लीलया पेलत होते.

कोरपना शहरातील राजकारणाचे वारे बघता सत्ताधारी-विरोधक असा सामना दिसणार होता. परंतु मतदानाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे तसेच शहराचा पूर्व इतिहास बघता पोलीस प्रशासनावर कायदा-सुव्यवस्था सांभाळणे मोठे जिकरीचे कार्य होते. सर्व प्रकारांमध्ये सत्ताधारी गटातील नेत्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला व पोलीस प्रशासनाने वरिष्ठांशी चर्चा करून कार्यवाहीच्या (ॲक्शन मोड) भूमिकेतून तात्काळ अधिकचा पोलीस कुमक मागवून शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ उचललेल्या कार्यवाहीमुळे सकाळी 7 वाजेपर्यंत कोरपना शहराला छावणीचे रूप घेऊन सर्व पोलीस प्रशासन शहराच्या प्रत्येक भागात गस्त झाली होती.

या सर्व कारणांमुळे मतदानाची प्रक्रिया ही 21/12/2021च्या सायंकाळी साडे पाच पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये गालबोट लागू न देता शांतपणे पार पडली. दरम्यान कोरपना शहर यांनी शहरातील नागरिकांचे पोलीस प्रश्नाबाबत असलेली आधीची प्रतिमा बदलून एक चांगली प्रतिमा बनली आहे. ही सर्व कामगिरी तरुण डॅशिंग ठाणेदार श्री ढाकणे साहेब यांच्या नेतृत्वात व त्यांच्या संपूर्ण टीमने पार पडली. त्यामुळे शहरवासीयांच्या मना मनात त्यांच्याबद्दल की प्रतिमा घर करून गेली. आपल्या शहर पोलीस प्रशासनाच्या देखील ठिकाणी सुरक्षित असल्याची भावना बघायला मिळत आहे, याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे.

आजपर्यंत असलेला शहराचा पूर्वइतिहास बदलून नक्कीच आपलं शहर सुरक्षित, शांततामय बनण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. कित्येकदा तर पोलिस पोलिस प्रशासन तीन-तीन दिवस 24 तास ड्युटीवर असत त्यांच्या अंगावर असलेली खाकी वर्दी आणि पायातील बूट यावरूनतर आपले प्रशासन चांगले प्रशासन असल्याची लक्षण आहे.

समाजकंटकांकडून बदनाम करण्याचा प्रयत्न

मतदान प्रक्रियेतला अतिसंवेदनशील असलेला काळ म्हणजे मतदानाच्या अगोदरची रात्र व मतदानाचा दिवस. याकाळात अनुचित प्रकाराला, गैरव्यवहाराला, घोडाबाजाराला मोठ्या प्रमाणात ऊत येत असतो. या सर्वांमुळे पवित्र असलेल्या निवडणूक प्रक्रियेला कलंकित करण्याचा प्रयत्न केला जातो. असाच गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण रात्रभर शहरात चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान काही समाजकंटकांनी आपले काळे धंदे लपवण्याच्या नादात सोशल मीडियावर काही व्हिडिओ वायरल करून पोलीस प्रशासनाला बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

विस्कटलेली घडी बसवण्याची कामगिरी

पोलीस स्टेशन कोरपणाचे नवीन ठाणेदार श्री. ढाकणे साहेबांनी गेल्या पाच-सहा महिन्यात पोलीस प्रशासनाची विस्कटलेली घडी बसवण्याची कामगिरी केली आहे. आज कोरपणा शहरातील प्रत्येक युवकांच्या मनात तडफदार संवेदनशील सक्षम आणि कर्तव्यदक्ष ठाणेदार लाभल्याचे समाधान अनुभवायला मिळत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे शहरवासियांना आणखीनच सुरक्षित असल्याची भावना ऐकायला मिळत आहे.

शहरवासियांना विश्वास आहे की, “आपलं शहर गुन्हेगारीमुक्त होऊन लवकरच शांततामय शहर म्हणून नावारुपास येईल यात काही शंका नाही.”

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...