आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
चंदूभाऊ कवाडे (यवतमाळ प्रतिनिधी): यवतमाळ दिनांक 28 ऑगस्ट रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची त्रेमासिक सभा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. आनंद भगत यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक विश्रामगृह यवतमाळ येथे कोरोनाचे सर्व नियम पाळुन आयोजित करण्यात आली. कास्ट्राईब कर्मचारी महासंघा अंतर्गत कार्य करणाऱ्या 14 विविध केडर शाखेच्या समस्यावर व केलेल्या कामावर चर्चा करण्यात आली, कृषी विभाग संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.हरिश रामटेके यांनी मनोगतामध्ये संघटनेचे काम प्रभावीपणे सुरू असून कृषी कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात मॅट मध्ये जाऊन न्याय मिळवून दिला, असे खंबीर पणे जाहीर केले.यामध्ये सिंहाचा वाटा श्री .चंदु मुन यांचा असल्यामुळे महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कास्ट्राईब जि.प कर्म संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. जी.आर. इंगोले यांनी बदली प्रक्रियेत सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळवून दिला तर श्री बनसोड यांची बदली करण्यासाठी आणि वार्षिक वेतन वाढ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व त्यांना यश आले श्री.शिरसाट यांनी पदोन्नती मधिल आरक्षणाची वास्तव स्थिती विषद केली.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे नाविन्यपूर्ण दिनदर्शिका तयार केली. त्यामध्ये चांगले घटनाक्रम तसेच कर्मचाऱ्यांचे फोटो, वाढदिवस, प्रकाशित केले या उपक्रमाबद्दल जिल्हा ध्यक्ष श्री. तुषार आत्राम यांचा सत्कार करण्यात आला .या सभेला विभागीय अध्यक्ष श्री सिद्धार्थ भवरे श्री. नामदेवराव थुल ,अतुल इडपाते ,किरण मानकर,संजय बारी, राजेंद्र खरतडे, धर्मराज सातपुते, संजय चचाणे, संदीप वाघमारे, तुषार आत्राम, अविनाश वाकोडे, आनंद कांबळे, हरिष रामटेके, अनिल डोंगरे, , चंदु मुन, रुपेश भगत, सुनील मालवे, सहदेव चहांदे , देवीचंद मेश्राम, विनोद कांबळे, अमोल भोसले, उत्तम थुल ,देविचंद मेश्राम, भाश्कर करपते, युवराज गायकवाड, सुभाष गेडाम, अशोक खरतडे, विजय तायडे , राजेंद्र वानखडे, गोवर्धन मेश्राम,यशोधरा काटकर,संजीवनी कांबळे,उपस्थित होते मनोगतामध्ये श्री राजेंद्र खरतडे यांनी संघटनेच्या सभासदांनी संघटनेच्या नेत्यावर विश्वास ठेवणे काळाची गरज आहे. विश्वासाशिवाय संघटनेला यश मिळू शकत नाही असे प्रतिपादन केले.
सभेचे प्रास्ताविक अतुल इडपाते यांनी केले तर सूत्रसंचालन श्री तुषार आत्राम यांनी केले. संघटनेच्या विविध शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व इतर मान्यवर सभासद यांनी मनोगत व्यक्त केले .अध्यक्षीय भाषणामध्ये श्री. आनंद भगत यांनी कुठल्याही मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये ,याकरिता सर्व केडर संघटनेच्या अध्यक्ष व सभासदांनी आपले संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असल्यास लेखी स्वरूपात संघटनेच्या अध्यक्षांकडे लेखी स्वरुपात देण्याचे आवाहन केले. सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते शेवटी आभार प्रदर्शन नागोराव कोंमपलवार सर यांनी केले.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...