खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ-जिल्हा-प्रतिनिधी) : शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, स्पर्धा परीक्षांसाठीचे कोचिंग क्लास व इतर कलागुणांच्या शिकवणी वर्गाकरिता घरून बाहेर पडणाऱ्या अल्पवयीन व तरुण मुला मुलींच्या हालचालींवर पालकांनी बारीक लक्ष ठेवणं आता गरजेचं झालं आहे. शैक्षणिक उपक्रमाकरिता व शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याकरिता जाणाऱ्या मुलामुलींची वेळोवेळी माहिती घेणेही जरुरी झाले आहे. अध्ययनाकरिता घरून निघणारी मुलं शाळा महाविद्यालयांचे वर्ग सोडून रस्त्यांवर मोटरसायकलने धूम फिरतांना दिसतात. पुस्तकांच्या बॅगा पाठीवर घेऊन निर्जन स्थळांचा शोध घेत बाईकने फिरत असतात.
एकमेकांना निर्लजपणे आलिंगन देऊन ही शाळाकरी व महाविद्यालयीन मुली मुलं शिक्षणाला बगल देत बाईकने फिरण्याचा आनंद लुटत असतात. शहरापासून दूर निर्जनस्थळांचा शोध घेऊन त्याठिकाणी तासंतास बसतात. दूरवर असलेली मंदिरं, अर्धवट बांधकाम झालेल्या इमारती, झाडाझुडपांनी वेढलेला परिसर व जंगल शिवारं या तरुणाई अंगात संचारलेल्या तरुण तरुणींच्या एकांतवासाचे व चाळे करण्याचे पॉईंट बनले आहेत. मित्र मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने पालकांच्या डोळ्यात धूळ झोकून मुलामुलींचा हा किळसवाणा प्रकार सुरु असल्याचे चित्र जिकडे तिकडेच पाहायला मिळत आहे. मुलामुलींचं असं हे बेफान वागणं त्यांच्या आयुष्याची धुळधान तर करीतच आहे, पण त्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे पालकांवरही नामुष्की ओढावली जात आहे. दूरवर निर्जनस्थळी जाऊन एकांतात बसणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा जराही विचार हे धुंदी चढलेले करतांना दिसत नाही. निर्जन स्थळी जाऊन चाळे करणाऱ्या कथित प्रेमी युगलांचा काही टपोरी युवकांकडून गैरफायदा घेतला जाण्याची दाट शक्यता असते. काही तरुण तरुणींना या दुष्परिणामांना सामोरे देखील जावे लागले आहे. सध्या या कथित प्रेमी युगलांचं एकांतात बसून चाळे करण्याचं "काजूबन" हे हॉसस्पॉट ठिकाण बनलं आहे. घनदाट झाडंझुडपं असलेलं हे जंगल "काजूबन" म्हणून नावारूपास आलं आहे. एमआयडीसीचा मागचा भाग असलेल्या या जंगलाकडे एका बियरबर पासून रस्ता जातो, त्याला काजूबन असे नाव देण्यात आले आहे. काजूबन येथे शाळा महाविद्यालयीन मुलं मुली व तरुण तरुणींचे टोळके चाळे करित बसलेली असतात. काजूबन हे जंगल एवढं घनदाट आहे की, या जंगलात शिरल्यानंतर कुणी कुणाच्या निदर्शनास पडत नाही. हे जंगल या कथित प्रेमी युगलांच्या सहवासाचे ठिकाण बनले असून या जंगलाकडे नेहमी त्यांची वारी सुरु असते. पण या प्रेमी युगलांच्या एकांतातील सहवासाचा काही टपोरी तरुणांकडून गैरफायदा उचलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आसपासच्या परिसरात राहणारी ही टपोरी मुलं त्यांचा मागोवा करित त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे कित्येकदा याठिकाणी टोळी युद्ध सुद्धा झालेली आहेत. मुलांसोबत एकांतात गेलेल्या मुलींची छेडखाणी करण्याचेही प्रकार या ठिकाणी घडले आहे. प्रेमी युगलांचा नेहमी वावर असणाऱ्या या जंगल परिसरात मुलींचा गैर फायदा घेण्याच्या कारणावरून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काजूबन म्हणून प्रचलित झालेलं हे जंगल कथित प्रेमी युगलांचं एकांतात वेळ घालविण्याचं ठिकाण बनलं आहे. अल्पवयीन मुलामुलींसह महाविद्यालयीन तरुण तरुणी एकांत शोधण्याकरिता या जंगलाचा आधार घेतांना दिसतात. कथित प्रेमी युगलांची टोळके या जंगलात तासंतास बसून असतात. एकांतात वेळ घालविण्याकरिता निर्जन स्थळांचा शोध घेऊन ही जोडपे त्याठिकाणी ठिय्या मांडून असतात. प्रेमाचे गोडवे गात त्यांचे चाळे सुरु असते. आता या जोडप्यांच्या एकांतवासाचं काजूबन हे प्रमुख ठिकाण बनलं आहे. या जंगल परिसरात मुलामुलींचे टोळके चाळे करित असतात. या जोडप्यांचा परिसरातीलच काही टपोरी मुलं मागोवा करून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा या कारणावरून याठिकाणी टोळी युद्ध सुद्धा झाले आहे. या टपोरी मुलांकडून मुलींची छेड काढून मुलांना धमकावण्याचे प्रकारही घडले आहेत. चोरीचा मामला असल्याने अनुचित प्रसंग घडल्यानंतरही कुणी उजागिरीने बोलायला तयार होत नाही. त्यामुळे टपोरी मुलांचीही हिम्मत वाढत चालली आहे. मोठा अनर्थ घडण्याआधी या परिसरात शोध मोहीम राबविणे गरजेचे आहे. काजूबन या जंगल परिसरावर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. पालकांनीही आपल्या मुलामुलींची वेळोवेळी माहिती घेणे गरजेचे झाले आहे. चुकीच्या मार्गाकडे वळणाऱ्या तारुण्याला समुपदेशाची नितांत गरज आहे. बेधुंद तारुण्यात भान हरपलेल्या मुलामुलींचा बेबंदपणा नंतर त्यांच्याच पथ्यावर पडतो, हे वास्तव नाकारता येत नाही.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...