Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / रेल्वेच्या नियमित सेवेला...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

रेल्वेच्या नियमित सेवेला प्रतीक्षाच..!

रेल्वेच्या नियमित सेवेला प्रतीक्षाच..!

विमानाला एक आणि रेल्वेला दुसरा न्याय देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

नागपूर (प्रतिनिधी) : करोनामुळे विमानातील प्रवासी क्षमतेचे निर्बंध हटवण्यात आले, मात्र सर्वसामान्यांसाठी प्रवासाचे प्रमुख माध्यम असलेल्या रेल्वेच्या नियमित सेवेवरील र्निबध कायम आहेत. देशात करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने केंद्र सरकारने विमानात क्षमतेच्या १०० टक्के प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. दुसरीकडे मात्र करोनाचे कारण देत रेल्वेने नियमित रेल्वेगाडय़ा सुरू केलेल्या नाहीत. रेल्वेचा भर केवळ विशेष गाडय़ा चालवण्यावर आहे. विमानाला एक आणि रेल्वेला दुसरा न्याय देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

देशात लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. करोनाची परिस्थिती नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत असून मोठय़ा प्रमाणावर र्निबध शिथिल करण्यात आले आहेत. त्याच मालिकेत केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतूक करणाऱ्या विमानात १०० टक्के प्रवासी वाहून नेण्याची मुभा दिली आहे. हा निर्णय १८ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे मात्र रेल्वेच्या नियमित गाडय़ांवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. पॅसेंजर ट्रेनही सुरू केलेल्या नाहीत. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.

रेल्वेच्या विशेष गाडय़ांमध्ये नियमित रेल्वेगाडय़ांपेक्षा अधिक प्रवास भाडे आकारण्यात येत आहेत. विशेष गाडय़ांमध्ये ज्येष्ठ नागरिक, कर्करोग रुग्ण, अपंग आणि पत्रकारांना प्रवास भाडय़ातील सवलत दिली जात नाही. अशा प्रकारे करोनाकाळात सुरू केलेल्या विशेष रेल्वे कायम ठेवून केंद्र सरकार प्रवाशांकडून अधिकचे भाडे वसूल करीत आहे, पण सवलतही देण्याचे टाळत आहे. एवढेच नव्हे तर विशेष गाडय़ा असल्याने त्याचे वेळापत्रक काढलेले नाही. त्यामुळे लोकांना प्रवास करताना असुविधा होत आहे, असे भारतीय यात्री केंद्राचे सचिव आणि झेडआरयूसीसीचे माजी सदस्य बसंत कुमार शुक्ला म्हणाले.


विमानातून १०० टक्के प्रवासी नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विमान वाहतूक कंपन्यांचा तोटा कमी होण्यास मदत होत आहे. त्याचप्रमाणे नियमित रेल्वेगाडय़ा सुरू केल्यास विशेष गाडय़ांमध्ये लागणारा अधिभार कमी होईल. रेल्वेगाडय़ांची संख्या वाढेल तसेच प्रवाशांचीही संख्या वाढेल आणि रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येईल, असा दावाही त्यांनी केला.

विशेष रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवाशांची ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे नियमित गाडय़ा सुरू करून काळजी घेण्यात यावी. परिणामी करोना प्रादुर्भाव  थांबण्यास मदत होईल. शिवाय रेल्वेगाडय़ांची संख्या वाढेल आणि प्रवासी भाडेदेखील कमी होईल : – बसंतकुमार शुक्ला, माजी सदस्य, झेड.आर.यू.सी.सी., मध्य रेल्वे

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...