पत्रकार दिनी आईच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार
वणी : भारतीय वार्ता येथील जेष्ठ पत्रकार व न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष आसिफ शरीफ शेख यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुबई या सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक क्षेत्रातील राष्टीय बाण्याच्या उपक्रमशील संस्थेद्वारे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन 2020 या उपक्रमात राज्यस्तरीय गुणीजन गौरव 2020 देऊन आसिफ शेख शरीफ शेख यांना गौरविण्यात आले. त्यांचा १५ वर्षापासुनचा पञकार शेञातील अनुभव, मिळालेले विविध पुरस्कार व त्यांच्या सततच्या लिखाणाने, कायम स्वरूपात पाणी योजनेस चालना, शहराला नविन अग्निशमन यासह विविध उपक्रम राबविले. त्यामुळे त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्न, गौरवपदक, आणि महावस्त्र आनलाईन प्रदान करण्यात आले होते.
हा पुरस्कार दि.6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रथम गुरु म्हणजे त्यांची आई शाहीदा ऐम शरीफ (स्वर्गीय पञकार लोकमत यांच्या पत्नी) यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारला. यावेळी त्यांच्या पत्नी शबाना.शेख व न्यूज मीडिया पत्रकार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी परशुराम पोटे, प्रविन शर्मा, शेख ईकबाल, डी के चांदेकर, नानूभाऊ बोनगीरवार,दिपक छाजेड,सागर मुने,निलेश चौधरी,रवि कोटाचा, विशाल ठोंबरे, महादेव दोडके ,नरेद्र लोवारे उपस्थित होते. या पुरस्कारामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.