Home / महाराष्ट्र / गोवामुक्ती आंदोलनातील...

महाराष्ट्र

गोवामुक्ती आंदोलनातील स्वातंत्र्यसैनिक असलेल्या जयानंद मठकर यांचे आज बेळगाव येथे निधन

गोवामुक्ती आंदोलनातील स्वातंत्र्यसैनिक असलेल्या जयानंद मठकर यांचे आज बेळगाव येथे निधन

गोवामुक्ती आंदोलनातील स्वातंत्र्यसैनिक असलेल्या जयानंद मठकर यांचे आज बेळगाव येथे निधन

भारतीय वार्ता (प्रतिनिधी):   कोकणातील समाजवादी चळवळीचे आधारवड असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ’वैनतेय’ या साप्ताहिकाचे संपादक  व गोवामुक्ती आंदोलनातील स्वातंत्र्यसैनिक असलेल्या जयानंद मठकर यांचे आज बेळगाव येथे के०एल०ई० हॉस्पिटलमध्ये निधन झाले. नाथ पै, मधु दंडवते यांचा सच्चा राजकीय वारसदार असलेले जयानंदजी मठकर एका अर्थी समाजवाद्यांच्या या एके काळच्या बालेकिल्ल्यातील अखेरचे शिलेदार असं म्हटलं तर वावगं ठरू नये.  
         राजकारणापेक्षाही समाजकारणात जास्त रस असलेला, राजकारणात वावरूनही विचार आणि विवेक यांच्यावरील निष्ठा ढळू न देणारा आणि कोकणातील सामान्य माणसांच्या जगण्यातील संघर्षाचे पक्के भान असलेला जनसामान्यांचा नेता अशीच त्यांची प्रतिमा होती. गेल्या जवळपास सात दशकांच्या संघर्षमय कालखंडाचा साक्षीदार असलेल्या मठकरांनी ग्रंथालय चळवळ, असंघटित कामगारांचे, मच्छीमारांचे शेतमजूरांचे प्रश्न, कोकण रेल्वे, पाणी प्रश्न अशा अनेक विषयांवर लेखन केले आहे. बॅ० नाथ पैंचे त्यांनी लिहिलेले चरित्र साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले आहे. या शिवायही विविध विषयांवरच्या वैचारिक पुस्तिकांचे लेखन त्यांनी केले आहे. मे० द० शिरोडकरांनी ९२ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या साप्ताहिक वैनतेयचे गेले जवळपास अर्ध दशक ते संपादन करीत होते. ( याच वैनतेयमधून ज्येष्ठ लेखक वि० स० खांडेकर यांचे ’गाढवाची गीता’ हे ललित लेखन सदर स्वरूपात प्रकाशित झाले होते. हे मराठीतले पहिले ललित निबंध मानले जातात. कवी आरती प्रभू यांच्याही प्रारंभीच्या विद्यार्थी दशेतील कविता या अंकांतून प्रकाशित झाल्या होत्या.) 
परिवर्तनाचा दिवा हाती घेऊन वाटचाल करणारा आणि आमच्या सारख्या खेड्यापाड्यातल्या, बहुजन समाजातल्या असंख्य पोरांना उजेडाची लख्ख वाट दाखवणारा आणखी एक कार्यकर्ता कसलाही गाजावाजा न करता निघून गेला आहे. 
असंख्य अनाम कार्यकर्त्यांसारखेच कसलेही सत्तेचे पद न उपभोगलेला, कुठल्याही चॅनलने, राज्य पातळीवरील वर्तमान पत्रांनी दखल न घेतलेला एक साथी आपल्यातून निघून गेला आहे. कोकणात कधी काळी लुकलुकणारा समाजवादी विचारांचा दिवा आणखीनच शीण झाला आहे, एव्हढंच आता राहून राहून मनात येत राहील. 
(Photo: सावंतवाडीतील कॉ० अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात पुस्तके खरेदी करतांना जयानंद मठकर. सोबत कॉ० पानसरे, सतीश काळसेकर, नगराध्यक्ष साळगावकर इ० मठकरांनी कॉ० पानसरेंच्या ’शिवाजी कोण होता’च्या शंभर प्रती खरेदी करून राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात मुलांना वाटल्या होत्या.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...