वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
झरी (तालुका-प्रतिनिधी) : येथील नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडवल्या असून राष्ट्रीय जंगोम दल व वंचित बहुजन आघाडी प्रणित झरीजामनी नगर विकास आघाडीने प्रचारात चांगलीच मुसंडी मारली असून स्थानिकांनी सर्व राजकीय पक्ष नाकारत आपली एकजूट दाखवल्याने प्रस्थापित राजकीय पुढारी मात्र यावेळी हतबल होताना दिसून आले आहे. येत्या २१ डिसेंम्बर रोजी झरीजामनी नगर पंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार असून या निवडणुकीच्या रिंगणात सर्वच पक्षांनी आपापले पॅनल उभारले आहे. यात जंगोम दल व वंचितने १० उमेदवार रिंगणात उभे केले आहे.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रीय जंगोम दल व वंचित बहुजन आघाडी प्रणित झरीजामनी विकास आघाडीच्या पॅनेलने आज मिरवणुकीचे आयोजन केले होते या मिरवणुकीत झरी जामनी, शिरोला , व इतर वॉर्डातील सर्व आदिवासी समाजातील नागरिकांनी एकवट स्वयंपूर्तीने एकत्रित येऊन पारंपरिक ढोल तश्याच्या गजरात उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या मिरवणुकीत राष्ट्रीय जंगोम दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मारोतराव उईके, गोंडवाना युवा जंगोम दलाचे मुख्य समन्वयक मंगेश मलगाम, सचिव सुमित पंधरे, गोंडवाना महिला जंगोम दलाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा वरखडे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, जिल्हा निवडणूक प्रमुख लक्ष्मणराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, निवडणूक निरीक्षक मिलिंद पाटील वणी तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, झरी तालुकाध्यक्ष कैलास धोटे, जंगोमचे मार्गदर्शक विठ्ठलराव उईके, चेतन कुडमथे, राजू शेख, गजानन मडावी,आदि उपस्थित होते. मिरवणूकीची सांगता दत्त मंदिर परिसरात करण्यात आली असून सर्व मान्यवरांनी उपस्थितांना आपले मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानेश्वर कोडापे, सीमा मंडाले, सुनीता मेश्राम, अनिल आत्राम, विकास उईके, राहुल धुर्वे, संगीता किनाके, विन्नता अर्के, कालिदास अर्के असे सर्व उमेदवार उपस्थित होते असून मिरवणूक यशस्वी करण्यासाठी मोहन अर्के, प्रशांत किनाके, सूरज आत्राम, सचिन कुमरे, आशिष येरमे, दिग्विजय मडावी, मनीष वेट्टी, आशिष उईके, रतन मडावी, श्रीकांत शेडमाके, हरिश किनाके, बंडू आडे, मारोती कुसराम, मारोती गाऊत्रे, विपीन अर्के, मंगेश कुमरे, मोहित आत्राम, तुषार कुमरे, विशाल कुमरे, निरज मडावी, अनीकेत मेश्राम, आदींनी परिश्रम घेतले असून यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...