Home / चंद्रपूर - जिल्हा / 3 जानेवारी पासून जिल्ह्यात...

चंद्रपूर - जिल्हा

3 जानेवारी पासून जिल्ह्यात जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम

3 जानेवारी पासून जिल्ह्यात जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम

पालकांनी 1 ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना लसीचा डोस देण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) हा एक गंभीर, अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे. जॅपनीज इन्सेफेलाइटिस (मेंदूज्वर) विषाणूमुळे होतो. हा आजार दूषित डासांमुळे पसरतो. या आजारांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण फार अधिक असते.

या आजाराच्या सुरुवातीला 5 ते 15 दिवसांमध्ये विविध लक्षणे दिसू लागतात. थंडी वाजून ताप येणे, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलटी इत्यादी लक्षणे दिसून येतात. हा आजार मेंदूमध्ये पसरून गंभीर स्वरूप धारण करू शकतो. बऱ्याच रुग्णांमध्ये झटके, फिट येणे किंवा बेशुद्धपणा होऊ शकतो. हा आजार झालेल्या 30 टक्के रुग्णांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते. साधारणत:40 टक्के रुग्णांमध्ये आजारातून बरे झाल्यावर मेंदूला झालेल्या इजेमुळे लकवा व मतिमंदत्व असे आजार राहू शकतात. 1 ते 15 या वयोगटातील मुले व मुलींना हा आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरुवातीला 1 ते 15 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींचे एकाच वेळेस जे.ई. लसीच्या एका डोसने लसीकरण केले जाते. त्यानंतर नियमित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत जे.ई. लसीचे दोन डोस, पहिला डोस वयोगट 9 ते 12 महिने व दुसरा डोस 16 ते 24 महिन्यापर्यंत दिले जातात.

ही मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात 3 जानेवारीपासून सुरू होत असून 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 1 ते 15 वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील एकूण 4 लक्ष 58 हजार 817 ग्रामीण, शहरी व महानगरपालिका क्षेत्रातील मुला-मुलींना या लसीचा एक डोस द्यावयाचा आहे. ही मोहीम पहिला आठवडा इयत्ता 1ली ते 10वीच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. व पुढील दोन आठवडे गावातील, वार्डातील अंगणवाडी समाजभवनमध्ये राबविण्यात येणार आहे.

या मोहीमेत देण्यात येणाऱ्या लसीचे नाव जेनवॅक असून ही लस भारत बायोटेक या संस्थेने निर्मिती केली आहे. ही लस सुरक्षित असून लस दिल्यानंतर काही बालकांमध्ये ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे, अंगावर पुरळ, किरकिर इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

चंद्रपूर जिल्ह्यात 3 जानेवारी 2022 पासून जॅपनीज इन्सेफेलायटिस जे.ई. या आजाराच्या प्रतिबंधाकरीता लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. तरी, संपूर्ण जिल्ह्यातील पालकांनी आपल्या 1 ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना या लसीचा डोस देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...