वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी (ब्रम्हपुरी) :- तालुक्यात राजकीय प्रभावाने रेती तस्करी साठी धावणारी "जनता गाडी" म्हणून प्रसिद्ध, माजी पंचायत समिती सभापती रवी पटवारू मेश्राम यांचा ट्रॅक्टर, समयसूचकता दाखवत कर्तव्यदक्ष युवा महसूल कर्मचाऱ्याने सापळा रचून तहसील कार्यालयात जमा केल्याने "आक्रमक" झालेल्या "त्या" राजकीय व्यक्तिमत्वामुळे तालुक्यातील नागरिकांना अर्हेर रेती घाटावर राजकीय प्रभावाने रेती तस्करी होतं असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वैनगंगा नदी पात्राची लूट करणारे कोण ? या प्रश्नावर जनता व वृत्तपत्राने नेहमीच विविधप्रकारे बाजू मांडली मात्र "गेंड्याची कातडी" धारण केलेल्या भ्रष्ट राजकर्त्यांना एकमेकांचे हितसंबंध जोपासतांना कधीच जाग आली नाही,मात्र अवैध रेती तस्करी मध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मुसक्या आवरल्या जातांना तस्करांशी संबंधितांना होणारा "जळफळाट" हा तालुक्यातील नागरिकांना हास्यकल्लोळ देऊन जातो एवढं मात्र नक्की.
मंगळवार ला अवैध तस्करी मध्ये जप्त माजी पंचायत समिती सभापती यांचा अवैध तस्करीत अग्रेसर "जनता गाडी" नावाने नागरिकात प्रसिद्ध ट्रॅक्टर , कर्तव्यदक्ष युवा महसूल कर्मचाऱ्याच्या कार्यकुशलतेने तहसील कार्यालयात जमा होताच, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तहसील पटांगणात सदर वाहणाजवळ उपस्थित होतं,तहसील कार्यालयाच्या आत-बाहेर आवेशाने ये -जा करीत होत्या तर छोटे-मोठे अधिकारी वर्ग आपला भ्रमणध्वनी "स्विच ऑफ" करून असल्याने मोठा पेच प्रसंग तहसील कार्यालय परिसरात निर्माण झाल्याने सदर विषय तालुक्यात खमंग चर्चेचा झाला आहे.
वाहक म्हणून कार्यरत योगेश्वर तलमले हा व्यक्ती वाहन क्रमांक नसलेला वाहन चेसिस क्रमांक MBNBT53AALCG 20946 अर्हेर घाटावरून अवैध रेती तस्करी करीत असल्याने या वाहणावर महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966/48 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करत तहसीलदार ब्रम्हपुरी यांनी कारवाई केली आहे तर सदर ट्रॅक्टरचे मालक रवी मेश्राम हे आहेत,अर्हेर नवरगाव रेती घाटावर राजकीय जनप्रतिनिधी स्व:हितासाठी अवैध रेती तस्करी करीत असल्याने त्यांच्यावर पक्षांतर्गत काय कारवाई होणार...? अथवा त्या राजकीय पक्षाचे तस्करीला समर्थन आहे का..?हे पाहणे आता तालुक्यातील नागरिकांसाठी औचित्याचे ठरणार.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...