Home / महाराष्ट्र / प्रकल्पग्रस्तांच्या...

महाराष्ट्र

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण न होताच प्रशासनाने केपीसीएल ला उत्खननाची मान्यता दिली हे दुःखद व निषेधार्ह - हंसराज अहीर

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण न होताच प्रशासनाने केपीसीएल ला उत्खननाची मान्यता दिली हे दुःखद व निषेधार्ह - हंसराज अहीर

चंद्रपूर (प्रतिनिधी):-  बरांज येथील कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. व्दारा कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्या व समस्यांचे निराकरण केले नसतांनाही प्रशासनाने कर्नाटक पाॅवर कार्पोरेशनला कोळसा उत्खननास मान्यता दिली हे कृत्य दुखःद व तेवढेच निषेधार्ह असल्याचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे. 
        बरांज कोळसा खाण कर्नाटका पाॅवर कार्पोरेशन लिमी ला लीज व्दारा हस्तांतरीत केली असुन सन 2015 पासुन या कोळसा खाणीतील उत्खनन बंद होते. सदर खाण सुरू होण्याच्या मार्गावर असतांना व या प्रकल्पातील प्रकलपग्रस्त, बाधीत गावे व जुने कामगार, कर्मचारी आदी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा सुरू असतांना या समस्यांचे निराकरण होण्याअगोदरच जिल्हाधिकाÚयांनी केपीसीएलला कोळसा उत्खननाची मान्यता देवून कर्नाटक राज्य सरकारची बाजु सांभाळली व स्थानीक शेतमालक असलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाÚयावर सोडुन दिले. हा निर्णय अत्यंत वेदनादायी  व तितकाच निषेधार्ह असल्याचे अहीर यांनी म्हटले आहे. सदर प्रकार हा मुळ मालक व स्थानीकांचा अपमान असुन ग्रामपंचायत आमसभेच्या ठरावाला कचÚयात टाकुन प्रशासनाने अवहेलना केली असल्याचेही अहीर यांनी स्पष्ट केले. 
           वास्तविक पाहता राज्य सरकारला काहीच भुर्दंड सोसावा लागत नाही.  निधीसुध्दा द्यावा लागत नसतांना असला उफराटा निर्णय घेतला जाणे प्रकल्पग्रस्तांचे नुकसान करणारे आहे. राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारात वाढ होणे अपेक्षित असतांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे असतांना या बाबीस तिलांजली देत जिल्हाधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय घेवून प्रकल्पग्रस्तांच्या भावना दुखावल्या आहेत. ते असे का वागले? हे समजण्यापलीकडचे आहे असेही अहीर यांनी म्हटले आहे. 
        प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्याच बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या संबंधात निर्णय झालेला असतांना त्या निर्णयाची अंमलबजावणी करवून न घेता त्यांनी मान्यता दिलीच कशी याबाबत अहीर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रशासनाने दिलेली उत्खननाची परवानगी त्वरीत रद्द करून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास प्रधान्य द्यावे अशी विनंती करतांनाच या अन्यायाच्या विरोधात नजीकच्या काळात प्रकल्पग्रस्तांसह तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय राऊत जिल्हा महामंत्री राजेश मुन, नामदेव डाहुले, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भद्रावती पं.स. सभापती प्रविन ठेंगने, नरेंद्र जिवतांडे, भाजपा किसान आघाडी अध्यक्ष राजु घरोटे, प्रशांत घरोटे, बरांज (मोकासा) चे सरपंच सौ मनिषा ठेंगने, उपसरपंच रमेश भुक्या व प्रकप्लग्रस्त संजय ढाकने, सुधीर बोढाले, मनोहर बोढाले, विजय रणदीवे, श्रीराम महाकुलकर, लक्ष्मण भुक्या आदिंची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...