Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / असा संवेदशील नेता लाभणे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

असा संवेदशील नेता लाभणे आपले भाग्यच || कोरपना नगरीत अनुभवायला आला एक अविस्मरणीय क्षण.

असा संवेदशील नेता लाभणे आपले भाग्यच || कोरपना नगरीत अनुभवायला आला एक अविस्मरणीय क्षण.

सामाजिक जाण असलेल्या नेत्याच एक मूर्तिमंत उदाहरण.

कोरपना(तालुका-प्रतिनिधी):  सध्या कोरपना नगरीमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आणि प्रचार सभा, रॅली यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला.. मोठ-मोठे नेते मंडळीच्या प्रचारसभा जोरात चालू आहे.अशीच सभा आज कोरपना नगरी मध्ये आज भाजपा+शेतकरी संघटना+कोरपना शहर परिवर्तन पैनेल च्या मार्फत आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये एका संवेदशील, सामाजिक जाण असलेल्या नेत्याच जीवंत अस उदाहरण कोरपना वासियांना अनुभवायला मिळालं.

या कार्यक्रमात मा.प्रमुख वक्ते श्री  सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मुख्य आकर्षण म्हणून लाभले. सभेदरम्यान त्यांचे भाषण चालु असताना ते अचानक भाषण देण्याचे थांबले. उपस्थितामध्ये एकच चर्चा होती कि, भाऊ का थांबले असेल ? पण थोड्याच वेळात सर्वाच्या लक्षात आले. भाषण थांबण्याचे कारण अस होत की, सभास्थळाच्याच बाजूला मस्जिद होती. तिथे अजाणचा आवाज ऐकू आला. तेव्हा मा. सुधीरभाऊनी आपले भाषण थांबवले. आणि जोपर्यंत अजाण संपत नाही तोपर्यंत ते तसेच मंचावर थांबुन होते. जेव्हा अजाण संपला तेव्हाच भाषणाला पुन्हा पूर्ववत सुरुवात केली. या सर्वामुळे मात्र सुधीरभाऊनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. यामधुन मुस्लिम समाजाच्या भावनाचा योग्य असा मान राखून सुधीरभाऊनी संवेदनशील नेत्याचा एक आदर्श उदाहरण आपल्या समोर मांडला. त्यांच्या या कृतीमुळे  "असा संवेदनशील नेता आपल्याला लाभला.! नेता असावा तर असा. आता आपल्याला परिवर्तन ला मत द्यायला काही हरकत नाही. आपण एका चांगल्या नेत्यालाच मत देणार आहो",अशा पद्धतीचे उच्चारण उपस्थितांच्या मुखामध्ये येऊन चर्चा सुरू होती. या सभेला मा.वामनराव चटप माजी आमदार ,मा.संजय धोटे माजी आमदार,मा.सुदर्शन निमकर  माजी आमदार , युवा स्वाभिमान पक्षाचे सूरज ठाकरे ,वरोरा नगराध्यक्ष मा.एहतेशाम अली जी मंचावर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...