शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
मारोती डोंगे (कोरपना प्रतिनिधी): मागील वर्षापासून सुरू झालेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबायचे नाव घेत नाही. आज प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली दिसत आहे. असे वाटून राहिले की, जणू निसर्गाने आपल्या कर्माचे फळ आपल्याला ह्याच जन्मी वाटून दिले का काय ? अशी परिस्थिती कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिसून येत आहे.
आज आपण जिवंत असूनही मरण यातना भोगत आहोत. हे कशाचे फळ आहे. आपल्या कर्माचे की, मागील जन्माच्या पापाचे हेच कळेनासे झाले आहे. या कारणामुळे..! प्रत्येक जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रेताना जणू स्मशानभूमीची वाट पाहू पाहू स्मशानभूमीच रडू लागली आहे, असे दिसून येते आहे.
माणूस कितीही मोठा झाला तरी स्मशानभूमीत यायला घाबरतो. आज तोच माणूस कोरोनाच्या विषाणूच्या सापळ्यात अलगत सापडत गेला आणि त्याच स्मशानभूमीत यायला घाबरलेला माणूस जणू स्मशानभूमीला आपल्या जिवाची विनवणी करू लागला आहे असेच म्हणावे लागेल.
आज प्रत्येक घडीला मानवाच्या चिता जाळण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहे. हीच मोठी शोकांतिका आहे. कारण अगोदरच मानवाने आपल्या जीवाचे रक्षण केले असते, तर ही वेळच आली नसती. मेल्यानंतरही रांगा लावण्याची.
रांगा या शब्दाची आठवण झाली म्हणून सांगतो. आपण लहानपणी राष्ट्रगीतासाठी शाळेत एका रांगेत उभे राहून राष्ट्रगान गात होतो. त्या गाणं गाण्यातून आपल्या देशाप्रती असलेले प्रेम, आदर भाव, मातृभूमीला काहीतरी देणे आहे, समाजाप्रती असलेली भावना, राष्ट्रगीता मार्फत मांडत होतो. पण आज तीच भावना जोपासली असती तर त्या रांगेबद्दल असलेला अभिमान वेगळ्या दृष्टीने पाहता आला असता. कारण ज्या वीर सुरांनी देशाचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर ताठ मानेने उभे आहेत. त्यांच्याच भरोशावर आपण जिवंत आहोत. त्यांच्याच विश्वासाला तडा आज आपण दिला आहे.
दररोजच्या चिता जळताना बघून स्मशानालाच भीती वाटू लागली आहे. माझ्या भूमीवर झालेले या चितेच्या राखेला आणि भूमीलाच कोरोना झाला तर मी कोणाकडे जाऊ. माझी चिता पेटवायला. हे एक कल्पनात्मक गोष्ट असली तरी भावनात्मक मांडणे आवश्यक आहे.
मानव हा समाजशील प्राणी आहे. त्याला अशा प्रेताच्या रांगा पाहून वेदना तर होणारच. नातेवाईकांचे, मित्रांचे, कोरोनाच्या प्रादुर्भावाने झालेले अकस्मात मृत्यू कुणाच्याही हृदयाला वेदना देऊन जातात. त्या वेदना इतक्या भयानक असतात की, शेवटच्या प्रसंगी त्याला जाणून घेण्यासाठी, दोन शब्द बोलण्यासाठी, काही आवडीची खाऊ घालण्यासाठी, आपल्या मनात असलेल्या भावना बोलण्यासाठी, एकमेकांना दिलेले वचन पाळण्यासाठी, शेवटच्या वेळेस रुग्णाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी केलेला आटापिटाही आपण करू शकत नाही. आपण याला काय म्हणायचे ? जवळ असूनही जवळ नसल्यासारखे वागणे म्हणजे मानवाची सर्वात मोठी हार आहे.
आपण आपल्याच नातेवाईकांच्या प्रेतांना अग्नी देऊ शकत नाही, त्याला शेवटचे क्षनभर पाहू शकत नाही. अशा वेदना पाहून स्मशान भूमी रडणार नाही तर काय करणार ? आपण स्मशानाला भूमी ची उपमा देतो. म्हणजेच कोणत्याही भूमीला आपण माताच म्हणतो. त्या मातेच्या वेदना आपल्याला केव्हा कळेल असे झाले आहे.
लेकरा तुझं कसमत जाणं, या मातेला वेदना देण्यासारखं झालंय.
रोज येऊनी प्रेता, अग्नी दिली तुझला.
माझी भूमी लाही लाही होऊन, मूक गिळून उभी आहेस.
तुझे स्मशानात येणे, एका मातेसाठी पुत्र गमावल्यासारखे झालंय.
तुझ्या चितेसाठी थांबवणे, मला अपराध्यासारख झालंय.
काय सांगु माझ्या वेदना, मलाच कळेनाशा झाल्याय.
लेकरा तुझं कस्टमर जाणं, मला नाही परवडणार.
स्मशानभूमीच्या वेदना ह्या आपल्याला मानवाला कळत नसल्या तरी ती माता आपल्याला हेच सांगत आहे. आता तरी आपली काळजी आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आपल्याच हातात आहे. ओसाड पडलेल्या या स्मशानात कधी महिना दोन महिन्यातून एक दोन प्रेत होते. त्यावेळेस त्यांना पुरविण्यासाठी सखेसोयरे, नातेवाईक येत होते. त्यावेळेस या स्मशानभूमी मातेला चिता देताना वेदना नव्हत्या होत. कारण नातेवाईकाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत असल्या तरी या भूमीला त्या अश्रूची जाणीव होती. नातेवाईकाने जे गमावले आहे. ते पुन्हा कधीच वापस येणार नाही. तेव्हा भूमीला होणाऱ्या वेदना मूक गिळून घेत होती हि भूमी.
आज या परिस्थितीत होत असलेल्या वेदना ह्या त्यापेक्षाही मोठ्या आहेत. ज्याना या जगाचे दर्शनही घेता आले नाही, संसाराचा गाडा हाकता हाकलता आला नाही, आपल्या माता-पित्यांची सेवाही करता आली नाही, आपल्या मुलाबाळांना बरोबर खेळविता आले नाही, आपल्या मित्र मैत्रिणीच्या मैफिलीत मज्जा करता आली नाही, लहान बहिणीला रुसताना बघून मोठा भाऊ या नात्याने आपलेसे करता आले नाही, आपल्या पत्नीचा शृंगार पाहून तिच्या प्रेमात एकरूप होता आले नाही. अशा ना ना प्रकारच्या कल्पना डोक्यात ठेवूनच जग सोडून जातो असेल तर त्या स्मशानभूमीला वेदना होणार नाही तर काय ?
प्रेतही जणू स्मशानभूमीला मनातले सांगत असेल कारण प्रेत जमिनीत एकरूप होण्याच्या वेळेस भूमीला त्याचा भास होत असेल. प्रेताच्या वेदना कळल्याशिवाय स्मशानभूमी रडू शकत नाही. रडणे ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. त्या वेदनेचा भास होणे हा भूमीच्या मातृत्वाचा भाग आहे. म्हणून जणू स्मशानभूमी रडू लागली आहे असे वाटते.
म्हणूनच या कोरोनाच्या महामारी पासून वाचायचे असेल तर आपल्या सर्वांची जबाबदारी बनते. आपणच आपल्या जीवनाचे भाग्य विधाता बनून कोरोनाच्या महामारीला रोखू शकतो. वेळ गेलेली नाही, कोरोनाला मुळापासून नाहीसे करण्यासाठी नियमाचे पालन करावेच लागेल.
मारोती बाबाराव डोंगे (लेखन मांडणी व शब्दांकन)
मु.पो.त. कोरपना जि. चंद्रपूर
9765015508
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...