खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: देविचा घट विसर्जित करतांना पुराच्या पाण्यात ईसम वाहुन गेल्याची घटना दि.१६ ऑक्टोंबर ला शनिवारी दुपारी ३ वाजताचे सुमारास घोंसा येथे घडली होती. तेव्हासापासुन त्या ईसमाचा शोध सुरू होता अखेर आज रविवारी २:३० वाजताचे दरम्यान त्या ईसमाचा म्रुत्युदेह शोधण्यात रेक्यु टिमला यश आले आहे.
राजू श्रीहरी बोरकुटे(५०) असे पुरात वाहुन गेलेल्या ईसमाचे नाव आहे. राजु बोरकुटे त्यांना पत्नी, एक मुलगी, व एक मुलगा असुन ते घोन्सा येथिल डंभारे यांच्याकडे सालगडी म्हणुन शेतीकाम करित होते. नवरात्रोत्सवा निमीत्य त्यांच्या मालकाच्या घरी देवीच्या घटाची स्थापना करण्यात आली होती. शनिवार पासून देवीच्या विसर्जनाला सुरवात झाल्याने मालकाच्या घरचा घट विसर्जन करण्यासाठी राजू बोरकुटे हे गावा लगतच असलेल्या विदर्भा नदीवर गेला होता. शुक्रवारी रात्रभर पाऊस पडल्याने नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यात घट विसर्जित करताना राजु च्या पायातील चप्पल निघुन गेली आणि तो चप्पल पकडत असतांनाच अचानक पुलाजवळील खोल खड्यात गेल्याने पुराच्या पाण्यात राजू वाहून गेला.
विशेष म्हणजे यावेळी गावातील काही लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समोरच हि घटना घडल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेची माहिती गावात पसरताच गावातील काही नागरिकांनी शनिवारी रात्री उशिरा पर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर प्रशासनाने शोध पथकाला पाचारण करण्यात आले असता आज रविवारला सकाळी पथक घोन्सा येथे दाखल होऊन पुरात वाहुन गेलेल्या राजु बोरकुटे यांचा शोध सुरु केला होता. शोध सुरु असतांनाच अथक परिश्रमानंतर अखेर राजु बोरकुटे यांचा आज दुपारी २-३० वाजता म्रुत्युदेह आढळुन आला असुन वणी ग्रामीण रुग्णालय त्या वर शवविच्छेदन करन्यात आले असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...