Home / चंद्रपूर - जिल्हा / कोविड दिलासा पॅकेज...

चंद्रपूर - जिल्हा

कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत आर्थिक मदतीसाठी कलावंताकडून प्रस्ताव आमंत्रित

कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत आर्थिक मदतीसाठी कलावंताकडून प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर, दि 29 डिसेंबर : जिल्ह्यातील प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलावंतांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने कोविड दिलासा पॅकेजअंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. इच्छुक कलाकारांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज पुढील दहा दिवसात संबंधीत तहसिलदार यांचेमार्फत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू होता. तसेच,लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमही या काळात स्थगित करण्यात आलेले होते. या काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटीत व असंघटीत कलाप्रकारातील विविध कलाकार,ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे, त्यांची आर्थिक कुचंबना झाल्याने संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कला प्रकारातील कलाकारांना शासनाच्या वतीने एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने  3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातून घेतला आहे.

पात्र एकल लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील समितीने पात्र केलेल्या कलावंतांची यादी विहित तपशीलासह संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचेकडे सादर केल्यानंतर त्यांचेमार्फत पात्र लाभार्थांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करण्यात येणार आहे.

कोविड दिलासा पॅकेजसाठी एकल कलावंतांकरीता पात्रता निकष व अटी :  राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असणारे आर्थिकदृष्टया दुर्बल कलावंत अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांचे महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असावे,वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादेत असावे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही.

एकल कलावंताने अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-ब-1 नुसार विहित नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखलाही ग्राह्य राहील. तहसिलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधार कार्ड व बँक खाते तपशील, शिधापत्रिका सत्यप्रत अर्जासोबत जोडावी.

समुह लोककलापथकांचे चालक, मालक, निर्माते यांनी 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-ब-2 नुसार सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे अर्ज सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त एकल कलाकारांनी आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
 

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...