Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / ओपन जिम च्या ठेक्यात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

ओपन जिम च्या ठेक्यात झालेल्या लाखोंच्या भ्रष्ट्राचाऱ्याची चौकशी करून कार्यवाई करा..!

ओपन जिम च्या ठेक्यात झालेल्या लाखोंच्या भ्रष्ट्राचाऱ्याची चौकशी करून कार्यवाई करा..!

विरोधी नगरसेवकांची जिल्हाधिकारीकडे मागणी..!

कोरपना (प्रतिनिधी):-  गडचांदूर नगरपरिषदेकडुन शहरातील विविध प्रभागाच्या ओपनस्पेसवर लावण्यात आलेले "ओपन ग्रिनजिम" सध्या शहरात चर्चेचा विषय बनला असून हे प्रकरण शहरा पुरतेच मर्यादित न राहता थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनापर्यंत पोहोचले आहे.नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजप नगरसेवक रामसेवक मोरे व अरविंद डोहे यांच्यासह शिवसेना गटनेता नगरसेवक सागर ठाकूरवार,शेख सरवर, सौ.वैशाली गोरे,सौ.सूनीता कोडापे,सौ. किरण अहिरकर व शेख रजी़या या नगरसेवक,नगरसेविकांनी २० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.यामुळे नवीन पाणी टाकी बांधकाम,घनकचरा व्यवस्थापन ठेक्याची,पीएमसी प्रकरणाच्या चौकशी पाठोपाठ आता ग्रिनजिमच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी होणार यात दुमत नाही.

  नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे सविस्तर असे की,नगरपरिषदच्या १६ मार्च २०२० रोजीच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अंदाजे १२ सर्व्हे नंबरच्या ले-आऊट मधील ओपनस्पेसवर ग्रीन जिम साहित्य लावण्याबाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.नंतर जिम साहित्याची दर निविदा बोलाविताना मात्र शक्कल लढवत  इतर दुसरे कुणी यात सहभाग घेऊ नये,कमी किंमतीची निविदा भरू नये म्हणून चलनात नसलेल्या साप्तहीक" प्रभात गुंजन'"या न्यूज पेपरला जाहिरात दिली.व संगनमत करून त्यात अमाप दर  टाकण्यात आले.हे कोटेशन ज्यांचे आहे ते बहुतेक अस्तित्वात सुद्धा नसावे अशी शंका आहे.यात आपल्या मनमर्जीने दर टाकून निविदा भरल्या व त्या निविदा समितीने उघडल्यानंतर कमी दरातील निविदा स्थायी समितीने मंजूर केल्या.मात्र ते दर बाजार दरांपैकी कितीतरी पटीने अधिक आहे.निविदा धारकांची जर सखोल चौकशी केल्यास निश्चितच खरे चित्र समोर येईल.

     या दरानुसार अंदाजपत्रक तयार करून चंद्रपूर सा.बां.विभागाकडून तांत्रिक मंजूरी घेऊन हे काम नगरपरिषदेच्या सहाय्य निधीतून घेण्याचे ठरविले.व इतर आवश्यक बाबी पूर्ण केल्यानंतर या कामाच्या ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या त्यावेळेस निकटवर्तीने आपल्या तीन निविदा सादर केल्या परन्तु त्यावेळेस इतर दुसरी पण  निविदा आली. त्यावेळेस सुद्धा त्या निविदा धारकाचे कागदपत्र योग्य असताना सुद्धा त्यांच्या निविदा अपात्र ठरविले.व आपल्या निकटवर्ती धारकाला काम देण्यास मदत केली. परंतू सदर निविदेतील दर बाजार दरांपेक्षा खूप जास्त असल्याची शंका व्यक्त करत फेर निविदा बोलाविण्यात यावी अथवा दर निश्चित केलेल्या कामाचा कार्यदेश देऊ नये.जर असे झाल्यास ३० लाखाहून अधिक असे फार मोठे नुकसान नगरपरिषदेचे होणार असल्याचे नगरसेवक डोहे यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना २९ आक्टोंबर २०२० रोजी दिले.तेव्हां आता करायचे काय ? या विवंचनेत यांनी बऱ्याच महिन्यांनी कामाचा कार्यदेश ठेकेदाराला दिला.मंजूर नसलेल्या ठिकाणी जिमच्या साहित्यांची फिटिंग करण्यात आली व बिल ठेकेदाराला दिले.जिम सहित्याचा दर्जा योग्य नाही,फिटिंग योग्य केले नाही,काँक्रिटीकरण योग्य केले नाही,जे केले ते फुटले,त्या ठिकाणी रेती टाकली नाही, काही ठिकाणी चिखल पसरून आहे,अशा अनेक ठिकाणाहून अनेक तक्रारी या विरोधी नगरसेवकांना प्राप्त होत असल्याने यांनी नुकतीच शहरातील संपूर्ण जिमची पाहणी केली तर सत्यपरिस्थिती समोर आली.यासंबंधी सविस्तर मौक्का पाहणी अहवाल तयार करून त्या अहवालावर जिम परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व विरोधी नगरसेवक,नगरसेविका यांनी स्वाक्षरी केली.आणि मा.जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी(न.प.)यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. नगरपरिषद नगराध्यक्ष, मुख्याधिकारी,विभाग प्रमुख व ठेकेदार यांनी संगनमत करून या कामात लाखोंचा भ्रष्टाचार करून नगरपरिषदेचा आर्थिक नुकसान केल्याचे आरोप निवेदनातून करण्यात आले असून सदर प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी,तत्थे आढळल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.आता सदर प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या दालनात पोहोचल्याने चौकशीअंती काय घडतंय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...