वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
धान पिकावरील तुडतुड्यांचे एकात्मिक व्यवस्थापन
चंद्रपूर दि.23 जुलै : भातावर तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे आणि पांढरे तुडतुडे असे तीन प्रकारचे तुडतुडे बागायती पाणथळ क्षेत्रामध्ये आढळून येतात. त्यापैकी तपकिरी तुडतुडे सर्वात जास्त हानीकारक आहेत. ही कीड पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात न होणाऱ्या, घन लागवड केलेल्या आणि नत्र खताची मात्रा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिलेल्या शेतात प्रामुख्याने आढळून येते.
त्याबरोबर 28 अंश से. ते 30 अंश से. तापमान, 85 टक्के पेक्षा जास्त आर्द्रता आणि कमी पाऊस या किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक ठरतो. तुडतुडे व त्यांची पिल्ले सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात. उपद्रव मोठ्या प्रमाणावर असेल तर रोपे वाळतात व जळल्यासारखी दिसतात. शेतात ठिकठिकाणी तुडतुड्यांमुळे करपून गेलेले गोलाकार भाताच्या पिकाचे खळे दिसतात. यालाच “हॉपर बर्न” असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि आल्याच तर दाणे न भरता पोचट राहतात.
तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक बांधीतील वेगवेगळ्या ठिकाणावरील दहा चुडांची निरीक्षणे घ्यावीत व धानाच्या बुंध्यावरील तुडतुड्यांची संख्या मोजून सरासरी प्रति चूड किती तुडतुडे आहेत, ते मोजून घ्यावेत. 10 तुडतुडे प्रती चूड रोवणी ते फुटवे अवस्थेपर्यंत, 10 तुडतुडे प्रती चूड फुटवे ते दुधाळ अवस्थेपर्यंत आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत. असे आवाहन कृषी विभागाचे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.
असे करा एकात्मिक कीड व्यवस्थापन:
तुडतुडयांचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लावणी दाट करू नये. दोन ओळीतील अंतर 20 सें.मी. आणि दोन चुडातील अंतर 15 सें.मी. ठेवावे तसेच रोपांची पट्टा पध्दतीने लागण करावी. नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात नत्र खताची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी. शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा, पाणी बदलावे.
टेहळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. प्रत्येक चुडात 10 तुडतुडे या आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे किटकनाशकाची फवारणी करावी. यासाठी हेक्टरी 500 लिटर पाण्यात इमिडाक्लोरोप्रीड 17.8 टक्के 125 मि.ली. किंवा थायामिथॉक्झाम 25 टक्के डब्ल्युजी 100 ग्रॅम किंवा क्लोथियानिडीन 50 टक्के 25 ग्रॅम किंवा बुप्रोफेजीन 20 टक्के + फिप्रोनील 3 टक्के एससी 500 मि.ली. मिसळून फवारावे किंवा इथोफेनप्राक्स 10 टक्के 500मि.ली. किंवा फेनोबुकार्ब (बी.पी.एम.सी.) 50 टक्के 600 मि.ली. या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी करतांना कीटकनाशक फुटव्याच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. आठवडयानंतर परत प्रादुर्भाव आढळल्यास दोन ते तीन फवारण्या कराव्यात, कीटकनाशके बदलून वापरावीत.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतक-यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना देण्याचे आवाहन
चंद्रपूर दि.23 जुलै : खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखीमेच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.
माहे जुलै महिन्यामध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबींमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमेअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप, संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषि व महसूल विभाग यांना कळवावे. नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल. या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीबाबतची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी 72 तासादरम्यान वैयक्तिकरित्या मोबाईल ॲपद्वारे, विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका,जिल्हा कार्यालयात किंवा कृषी,महसूल विभागास देणे आवश्यक आहे.
याबाबत अधिक तपशिलासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...