Home / महाराष्ट्र / कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी...

महाराष्ट्र

कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी तातडीने 75 बेड कार्यान्वित करण्याचे निर्देश    -ना.वडेट्टीवार

कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी तातडीने 75 बेड कार्यान्वित करण्याचे निर्देश    -ना.वडेट्टीवार

कोविड पेडियाट्रिक रुग्णांसाठी तातडीने 75 बेड कार्यान्वित करण्याचे निर्देश       -ना.वडेट्टीवार

चंद्रपूर: कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता 75 आयसीयु बेड तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत.

त्या अनुषंगाने स्त्री रुग्णालय येथे लहान मुलांसाठी वेगळा व स्वतंत्र ऑक्सीजन युक्त व आयसीयु बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यासाठी जिल्हास्तरावर पेडियाट्रिक टास्क फोर्स स्थापित करण्यात आली असून सदर टास्क फोर्स मार्फत तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने एसओपी, ट्रीटमेंट प्रोटोकॉल, लहान मुलांच्या उपचारासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत नियोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयात सुद्धा कोविड पेडियाट्रिक (बालरुग्ण) रुग्णांकरिता उपचाराची सोय उपलब्ध करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील एकूण तीन रूग्णालयाला कोविड पेडियाट्रिक रुग्णांच्या उपचाराकरिता स्वतंत्र मान्यता देण्यात आलेली आहे.
सदर रुग्णालयामध्ये अक्सिजन युक्त बेड,आयसीयू, व्हेंटिलेटर, सुसज्ज ठेवण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
तसेच कोविड पेडियाट्रिक (बालरुग्ण) रुग्णांच्या व्यवस्थापनाकरिता लागणारे सर्व साहित्य, औषध साठा, सामुग्री जसे की न्युवोनेटल वेंटीलेटर, सीपॅप उपलब्ध करून घेण्याबाबतचे निर्देशही दिले.

आपल्यापासून लहान मुलांना संसर्ग होणार नाही यासाठी पालकांनी विशेष काळजी व दक्षता घ्यावी. तसेच मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये शक्यतो लहान मुलांना बाहेर नेऊ नये. लक्षणे आढळल्यास त्वरित बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...