Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / धम्मभूमी कोटंबा येथे...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

धम्मभूमी कोटंबा येथे मार्गशिर्ष पौर्णिमे निमित्त मुच्छलिंद नागप्रतिमेची प्रतिष्ठापणा व धम्मदेसना ,धम्मप्रबोधन कार्यक्रम.

धम्मभूमी कोटंबा येथे मार्गशिर्ष पौर्णिमे निमित्त मुच्छलिंद नागप्रतिमेची प्रतिष्ठापणा व धम्मदेसना ,धम्मप्रबोधन कार्यक्रम.

प्रविण गायकवाड (तालुका प्रतिनिधी) कोटंबा: बुद्ध संदेश शिक्षण प्रचार सभा, धम्मभूमी मासिक पत्रिका, साप्ताहिक शेतकरी सत्ता कोटंबा ता.बाभूळगाव जि. यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने धम्मभूमी महाविहार कोटंबा येथे दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी, मार्गशिर्ष पोर्णिमे निमित्य भगवान बुद्धाच्या भव्य मुच्छलिंद नागप्रतिमेची प्रतिष्ठापना, परित्राण, धम्मदेसना, धम्मप्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी संघ नायक पूज्य भदंत सुमंगलबोधी महास्थवीर ( अकोला) , पूज्य भदंत चंद्रमणी महास्थवीर ( अमरावती ), पूज्य भदंत राहुलबोधी महास्थवीर अध्यक्ष ऑल इंडिया भिक्षु संघ ( यवतमाळ ), पूज्य भदंत सरनंकर महास्थवीर विपश्यना आचार्य नागपूर, पूज्य भदंत राजरतन महाथेरो, पूज्य भिक्षु धम्मसार, पूज्य भिक्षु धम्मरतन, आर्या विशाखा, आर्या वैशाली आदि पूज्य भिक्षु गण उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विजयजी डांगे व्यवस्थापक धम्मभूमी कोटंबा तसेच प्रमुख अथिती म्हणून मा.अँड. गोविंदरावजी बन्सोड सेवा निवृत्त सरकारी अभियोक्ता यवतमाळ, मा. रमेशराव लोहकरे साहेब सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक मुंबई, मा.डॉ.टि.यु.फुलझेले साहेब सेवानिवृत्त संचालक इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली, मा.प्रा.रविंद्र दारुंडे आर्वी, मा.अँड. निरंजन दवणे उमरखेड आयु.डी.एन. भगत सर, आयु दिलीप वाघमारे, आयु अशोक कांबळे, आयु. नाईक सर, आयु.शंभरकर सर, आयु.विनय डांगे, आयु.लक्ष्मनराव भगत, कोटंबा ग्रा.प.चे सरपंच सौ.सुनंदाताई वाकेकर, आदि मान्यवर उपस्थित होते.  

 यावेळी धम्मदेसना करतांना पूज्य भदंत सुमंगलबोधी महास्थवीर ( अकोला)  म्हणाले कि, उपासकांनी धम्ममार्गावर आरूढ होऊन धम्माचे प्रतिपालन करावे, प्रमुख अतिथीय भाष्य करतांना मा.डॉ.टि.यु.फुलझेले साहेब म्हणाले कि, ज्या- ज्या राष्ट्रांनी बुद्धांचे विचार स्वीकारले ते – ते राष्ट्र आज महासत्ता म्हणून उदयास आले. मा. रमेशराव लोहकरे साहेब मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, धम्मभूमीकडे बघितल्या नंतर अपेक्षेपेक्षाही अधिक भरभराट व विकास दिसून आला. आदरणीय प्रा.रविंद्र दारुंडे सर यांनीही धम्मप्रबोधन केले.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मभूमी,बुद्ध महाविहार कोटंबा चे व्यवस्थापक मा.विजयभाऊ डांगे साहेब म्हणाले कि, शिक्षण सर्व विकासाचा पाया असून शिक्षणाचे महत्व सर्वांनी जाणून घ्यायला हवे, व शिक्षणाला धम्माची जोड असावी. कार्यक्रमाला अनेक गावांवरून उपासक उपासिका मोठ्या संख्येने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित होते. कार्यक्रमात मा.रमेशराव लोहकरे साहेब, मा.टी.यु.फुलझले साहेब, सौ.अरुणाताई बन्सोड, व अनेक उपासकांनी धम्मदान देवून आपली पुण्यपारमी पुष्ठ केली.

 परिसरात या वेळी उपस्थित भिक्षु संघ व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तसेच वसतिगृहातील गरजवंत विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते, शालेय गणवेश व उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. समता ढेंगळे यांनी केले, संचालन आयु.डी.एस.कांबळे यांनी केले तर आभार आयु. अश्विन खोब्रागडे यांनी मानले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...