Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा शिक्षक पतसंस्थेत...

चंद्रपूर - जिल्हा

वरोरा शिक्षक पतसंस्थेत लायक जेष्ठ महिला कर्मचाऱ्याला सेवेतून काढून अन्याय..!

वरोरा शिक्षक पतसंस्थेत लायक जेष्ठ महिला कर्मचाऱ्याला सेवेतून काढून अन्याय..!

(आमसभेत सभासदांच्या रोषाला निरुत्तर होवून संचालक मंडळाने काढला पळ)

वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा शिक्षक सह.पतसंस्थेत सौ.संगीता वरघने ह्या महिला कर्मचारी दि. १७/४/२०१७ पासून गेले चार ते पाच वर्ष संगणक आॕपरेटर म्हणून कार्यरत होत्या. पतसंस्थेचे सर्व सदस्य याचे साक्षदार आहे. त्यांनी ही पतसंस्था संगणीकृत करण्यात फार मोठे परिश्रम घेतले व सर्व व्यवहार सुरळीत केले. ५०% महीला सदस्य असणाऱ्या या पतसंस्थेत आपली महिला कर्मचारी असल्याने सर्व महीला सदस्यांना आपुलकी होती तथा कसलीही चिंता वाटत नव्हती. परंतु या पतसंस्थेने 'गरज सरो वैद्य मरो' या युक्तीप्रमाणे या महिला कर्मचाऱ्याला तडकाफडकी काढून टाकून तिच्या प्रपंचाची वाट लावून फार मोठी वाताहात केली. संचालक मंडळाने लायक कर्मचाऱ्याला काढून स्वतःचे हितसबंध जपण्यासाठी ज्यांना सहकार खात्याचे, संगणकाचे ज्ञान नाही अशांची कसलीही लायकी न बघता भरती करुन स्वतःचे भले करुन पतसंस्थेचे अहीत केले आहे. गेल्या चार वर्षापासून कार्यरत असलेल्या सिनीअर कर्तव्यदक्ष व संगणकाचे इतंभू ज्ञान असलेली कार्यरत इतर चार तिस तीस हजार पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम एकट्याने सांभाळणारी ही महीला कर्मचारी अवघ्या सात हजार पगारावर राबराब राबून पुढील आपल्या भविष्याच्या आसेवर आपल्या प्रपंच मुलाबाळाची स्वप्न बघत होती.परंतु पतसंस्थेच्या या निष्ठूर स्वार्थी व भ्रष्ट संचालक मंडळाने या महीलेला धोका दिला व तिला काढून टाकून तिच्या स्वप्नाचा व भावी आयुष्याच्या प्रपंच्याचा चुराडा केला. सदर लायक महिला कर्मचारी कार्यरत  असतांना संचालक मंडळाने दि.८/७/२०१९ ला आपल्या हितसबंधातील कसलीही योग्यता अनुभव तथा परिक्षा न घेता व आमसभेची मंजुरी न घेता सर्व सभासदांना अंधारात ठेवून नवीन कर्मचारी नियुक्त केला व सदर पतसंस्थेतील संगणक तथा उच्च शिक्षित एकमेव सिनीअर असलेल्या महिला कर्मचाऱ्याला दि.१८/७/२०२१ ला तडकाफडकी कसलेही कारण नसतांना सेवेतून काढून टाकले हा सारासार सदर महिलेवर घोर अन्याय आहे. दि. ८/८/२०२१ च्या आॕनलाईन पतसंस्थेच्या आमसभेत अनेक सदस्यांनी सदर महिला कर्मचाऱ्याला काढल्याबाबत प्रश्न उपस्थित केला परंतु संचालक मंडळ निरुत्तर होवून सभासदांचे समाधान करु शकले नाही. कोणतेही कारण नसतांना कर्तव्यदक्ष महीला कर्मचाऱ्याला  काढून नवीन कर्मचाऱ्याची भरती करणे हे कोणत्याही सुज्ञ सभासदाला न पटणारे होते. अनेकांनी या संचालक मंडळावर ताशेरे ओढून प्रश्नचिन्ह उपस्थित केले सर्वांनी एकजुटीने सदर महिलेला न्याय द्यावा अशी मागणी केली. पतसंस्थेतील सदर प्रकार हा मानवाधिकाराचे हनन  असून सदर महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी  मानवाधिकार आयोगाकडे तथा न्यायपालीकेत पतसंस्थेच्या संचालक मंडळा विरोधात दाद मागून न्याय मिळवून देण्याचा सर्व सदस्यांचा निर्धार दिसून आला. संचालक मंडळाच्या सदर गैरप्रकाराने संस्थेच्या महिला सदस्या तर अतिशय दुःखी दिसुन येत होत्या.अनेक महिला सदस्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...