Home / चंद्रपूर - जिल्हा / डोनी-फुलझरी येथील आदिवासी...

चंद्रपूर - जिल्हा

डोनी-फुलझरी येथील आदिवासी युवकांना वन विभागाची अमानुष मारहाण..!

डोनी-फुलझरी येथील आदिवासी युवकांना वन विभागाची अमानुष मारहाण..!

संपूर्ण गावकऱ्यांचा जिल्हाकचेरीवर राजु झोडे यांच्या नेतृत्वात न्यायासाठी आक्रोश

चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी):- ताडोबा बफर झोन अंतर्गत मूल तालुक्यातील फुलझरी व डोनी या गावातील आदिवासी युवक फुलझरी वरून डोनीला जात असताना अचानक त्यांची गाडी खराब झाली. त्यामध्ये आशिष नैताम, भारत कोवे, मनोज मरापे हे तिघे आदिवासी युवक होते. भारत कोवे हा पायदळ वाटेत जात असताना अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना ३० डिसेंबरला घडली व सदर प्रकरण  ३१ डिसेंबरला उघडकीस आले.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान वनक्षेत्र संचालक गुरुप्रसाद यांच्या सांगण्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर व उपक्षेत्र अधिकारी धुर्वे व त्यांचे इतर अधिकारी व कर्मचारी फुलझरी व डोनी येथील युवकांना रात्री घरात घुसून व त्यांना उचलून  जबरदस्तीने ओढत नेऊन गाडीत कोंडले व त्यांना जंगलात नेऊन तुम्हीच भारत कोवे या युवकाचा खून केला असा बयान पोलिसांना द्यावा अशी जबरदस्ती करून व दबाव आणून बेदम अमानुष मारहाण केली. वाघाचा हल्ला केल्याची घटना दाबून टाकण्यासाठी क्षेत्र संचालक गुरुप्रसाद यांच्या इशाऱ्यावरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेदम अमानुष मारहाण केली. गावकऱ्यांनी सदर प्रकरण उचलून धरताच प्रकरण वन विभागाच्या व आपल्या अंगलट येईल असा प्रकार दिसताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी युवकांच्या घरी जाऊन हात पाय जोडून प्रकरण मागे घेण्याची विनवणी केली. केस मागे न घेतल्यास गावकऱ्यांना व आदिवासी शेतकऱ्यांना शासनाच्या दिलेल्या जमिनी परत घेऊन वन कायद्याअंतर्गत गावकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात आम्ही अटकवू शकतो अशा धमक्या उपक्षेत्र संचालक गुरुप्रसाद यांच्या इशाऱ्यावरून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदिवासी व गावकऱ्यांना सातत्याने देत आहेत. ही बातमी गावकऱ्यांनी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांना कळविताच त्यांनी डोनी व फुलझरी या गावांना भेट दिली व दुसऱ्याच दिवशी जिल्हा कचेरीवर संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन न्याय मिळवण्यासाठी निवेदन दिले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रकार करणाऱ्या व अमानुष मारहाण करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनात केली.

 सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत गावकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. जर मागणी तात्काळ पूर्ण झाली नाही तर उलगुलान कामगार संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टी उग्र आंदोलन करणार असाही इशारा देण्यात आला. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, डोनी येथील उपसरपंच विकास कुडमेथे, जितेंद्र बोरुले, आशिष नैताम, संपत कोरडे, गौतम गेडाम तथा अन्य गावकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी. 23 January, 2025

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत 23 January, 2025

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत

वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...

*निधन वार्ता* 23 January, 2025

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था  तात्काळ करा. 23 January, 2025

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था तात्काळ करा.

वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी येथील ट्रॉमा केअर युनिट हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा...

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* 22 January, 2025

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार  किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* 22 January, 2025

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...