*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सर्व शेतकरी कुटुंबातील सदस्याना लागू शासन परिपत्रकाच्या आधारे योजना आपल्या दारीं -दिलीप भोयर सामाजिक कार्यकर्ते याचे आव्हान
वणी : शेतकरी समाजावर दररोज एक ना एक संकटे येत असतात त्यामुळे त्या संकटातूनही जगण्याचा मार्ग मिळाला पाहिजे शासन दरबारी शेतकाऱ्यांसासाठी विविध योजना आहे परंतु त्या माहिती च्या अभावी शेतकरी योजनेपासून वंचित असतात म्हणून आज शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोयर यांचे कडून घेण्यात येत आहे.बुळते हे जन देखवेना डोळा!म्हणूनी कडवळा येतो आम्हा, या संत विचार धारेतून विचार पेरीत होऊन त्यानी ही माहिती सर्व शेतकरी वर्गाला अंत्यत महत्वाची लाभ दायक असल्याचे सांगितले आहे.
या योजनेचा लाभ सर्व शेतकरी घेऊ शकतात व त्यांच्या वारसांना मिळू शकतात यात कोणतीच अट नाही. म्हणून वणी जिल्हा यवतमाळ येथील तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी पुत्र व श्री गुरूदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप रामदासजी भोयर यांचे कडून ही माहिती आपल्याला देण्यात येत आहे. तसेच दिलीप भोयर हे वंचित बहुजन आघाडीचे वणी तालुकाध्यक्ष देखील आहे.
म्हणून सरपंच / उपसरपंच / सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी सामाजिक भावनेने गावातील कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करून लाभार्थ्याना लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करायचे आहे. या योजनेत शेतकरी स्वतः किव्हा त्यांचे कुटुंबातील कोणताही व्यक्ती अपघाताने मृत्यू पावल्यास किव्हा कायमचे अपंगत्व आल्यास या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अगोदर ही माहिती आपण पूर्ण वाचा व प्रत्येक शेतकऱ्यांच्या घराघरात ही माहिती पोहचवा असे आव्हान त्यानी केले आहे.
१) २ लाख ₹ मृत्य पावल्यास
२) १ लाख ₹ कायमस्वरूपी
अपंगत्व आल्यास
ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे.
हि माहिती शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबियांना अत्यंत महत्वाची आहे. यात कोणतेही बंधन नाही सर्वांसाठी आहे. आगोदर सविस्तर वाचा आणि मग समजून घ्या. मग सर्वत्र शेअर करन्याची गरज आहे,ही समज्याची भावना भाऊ बंधू या सहकार्यातून निर्माण करण्यासाठी एक मेकास साह्यकरून आर्थिक दृष्ठया मदत करू या हे विचार घेऊन आपणास ही माहिती दिलीप भोयर हे देत आहेत शेतकरी व त्यांच्या कुटुंबीया करिता अत्यंत गरजेचे माहिती आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने विषयी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही विमा काढून ठेवायची गरज नाही. ही योजना सर्व शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला लागू आहे.
माहिती सविस्त वाचा आणि समजून घ्या. त्या योजनेचा लाभ घेताना जे शेतकरी महिला - पुरुष यांचे नावाने ७/१२ नोंद आहे अश्याना व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना या योजनेचा लाभ मिळतो तो लाभ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नावे असून ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे.
१) अपघातात मृत पावलेल्या शेतकरी कुटुंबातील वारसांना २ लाख रुपये मिळतात .
२) शेतकरी किव्हा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मिळतात.
वय मर्यादा
वय १० ते ७५ वर्ष
अपघाताचे प्रकार
१) वीज पडून मृत्य पावणे.
२) विषारी साप, विंजु चावल्याने
मृत्यू पावणे, अथवा जंगली,
किव्हा पाळीव प्राण्यांच्या
हल्यात मृत्यू पावने किव्हा
अपंगत्व येणे.
३) नदी,नाला तलावाच्या पाण्यात
वाहून मृत्य पावणे. किव्हा
तोल जाऊन पाण्यात बुडून
मृत्य पावने
४) कोणत्याही वाहनाने अपघात
होऊन मृत्य पावने. किव्हा
अपंगत्व येणे
५) फवारणी दरम्यान विषबाधा
होऊन मृत्यू पावने.
एकंदरीत शेतकरी हा अपघाताने मृत्यू असावा. किव्हा अपंगत्व आलेला असावा.
(तो स्वतःहून आत्महत्या केलेला नसावा)
यात दोन भाग आहे
१) अपघाताने मृत्यू झाल्यास २
लाख रुपये.
२) अपघाताने अपंगत्व आल्यास
१ लाख रुपये. यात
(एक पाय, एक हाथ, एक डोळा अन्य कोणताही शरीराचा अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास) आणि तसे जिल्ह्याशल्य चिकित्सक (C.S) यांचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
आता बघू या लाभ घेण्यासाठी काय काय दस्तवेज लागतात ते
लागणारे कागजात
१) शेतीचा ७/१२ व ८ अ
२) (६ ड )म्हणजे शेतीचा फेरफार
३) (६ क) वारस असल्याचा
दाखल (तो तलाठी भरून
देतात)
४) मृत्यू प्रमाणपत्र / अपंगत्व
आल्यास अपंगांचे प्रमाणपत्र
५) जन्म प्रमाणपत्र किव्हा शाळा
सोडल्याचा दाखला
६) आधार कार्ड
७) लाभार्थ्यांचे बँक पास बुक
(आधार लिंक असलेले)
८) मृत्य झाल्यास शव विच्छेदन
अहवाल ( पी.एम.रिपोर्ट)
झेराक्स कॉपी प्रमाणित
९) घटनास्थळ पोलीस पंचनामा
झेराक्स कॉपी प्रमाणित
१०) रेशनकार्ड प्रमाणित झेराक्स प्रत
११) प्रतिज्ञापत्र (प्रपत्र- ड)
१२) अर्जदाराचे दोन कलर पासपोर्ट फोटो
अश्या प्रकारे कागजात लागतात.
तर आता बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठं मिळतो.
दिलीप भोयर
9421773771 हा क्रमांक सेवा करा आणि वॉट्सअप्प वर मेसेज टाइप करा की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे अर्ज pdf फाईल पाठवा म्हणून अर्ज तुमच्या वॉट्सअप्प वर येऊन जाईल त्याची प्रिंट काढून घ्या.
वरील काही कागजात समजले नसतील तर तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करा.
आता बघू या अत्यंत महत्वाची माहिती ती म्हणजे या योजनेत लाभ घ्यायचा असल्यास जो व्यक्ती मृत्य पावतो त्यांच्या कुटुंबीयांनी किव्हा अपंगत्व ज्यांना आलं त्यांनी ज्या दिवशी घटना घडतात त्या दिवसापासून ४५ दिवसाचे आत हा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा तरच या योजनेचा लाभ मिळतील.
या योजनेसाठी शेतकरी आत्महत्या येत नाही व पोहण्यासाठी जाणे आणि बुडून मृत्यू पावने अश्या घटना येत नाही.
सर्व प्रथम की कोणत्याही शेतकऱ्यांच्या घरी दुःखाचा दिवस येऊ नये परंतु निसर्गाचे काल चक्र हे नेहमी फिरत असतात. म्हणून दुखातूनही मार्ग शोधण्यासाठी सरकारची मदत घेणे हा आपला अधिकार आहे. अश्या योजनेपासून आपण वंचित राहू नये म्हणून ही महिती आपणास देत आहो.
आशा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल. जर समजली नसेल तर सरळ तालुका कृषी अधिकारी कार्यलयात जाऊन तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क साधून माहिती घेऊ शकता जर तालुका कृषी अधिकारी माहिती देण्यास अथवा अर्ज देण्यास टाळाटाळ करीत असेल तर मला मो 9421773771यावर संपर्ग करून त्या कार्यल्याचा किव्हा त्या अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक द्या.असे आवाहन दिलीप भोयर यांनी लाभार्थ्याना केले आहे.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...