Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / आगीत घर जळून खाक कुटुंब...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

आगीत घर जळून खाक कुटुंब उघड्यावर आसापूरातील घटना

आगीत घर जळून खाक कुटुंब उघड्यावर आसापूरातील घटना

जिवती : पहाडावरील जिवती तालुक्यातील आसापूर येथे चंदू भिमराव कोटनाके यांचे घर सोमवारी मध्यरात्री जळून खाक झाले. यात त्यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तुंचा कोळसा झाला आहे. यावेळी कुटुंबातील व्यक्ती हे शेतात राखण करण्यासाठी गेले असता. घरी फक्त लहान मुलगी होती.घरी कुणीच नसल्याने ती जेवन करून आपल्या नातेवाईकांच्या घरी जोपयला गेली होती.

अचानक मध्यरात्री हि घटना घडल्याने सुरूवातीला कुणाला माहिती झाली नाही.शेजारी एक बाई उठल्यावर आगीचे दुवा दिसत असल्याने घराला आग लागली म्हणून आरडाओरडा करत पूर्ण गाव जमा झाल्यावर संपूर्ण गावकऱ्यांनी आग विजवण्यात प्रयत्न केले. आग खूप वेगाने असल्यामुळे पूर्ण घर जाळून खाक झाले या आगीत कोटनाके यांच्या घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला.

यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीत घरातील कागदपत्रे, शेतीचे पट्टे, शेती उपयोगी साहित्य, गादी, कपडे, धान्य, स्वयंपाकाचे भांडे यासह कापूस 12 किंटल 8200 च्या भावाने मिळालेले रोख रक्कम व साहित्त्यासह जवळपास दिड लाखाचे नुकसान झाले आहे .आग विझविण्यासाठी घरी पाणी उपलब्ध नसल्यामुळे दिवाळी सण साजरा करण्याकरिता गावात ड्रम मध्ये पाणी भरून असल्यामुळे तेथील पाणी आणून आग विझविण्यात आली. घरात कोणीच हजर नसल्यामुळे जीवितहानी टळली.

आगीत सर्वच भस्मसात झाल्यामुळे अंगावरील कपड्याशिवाय त्यांचे जवळ काहीच शिल्लक राहले नाही. तलाठी गोवर्धन यांनी पंचनामा केला असून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.यावेळी आपत ग्रस्त कुटुंबीयांच्या भेटीसाठी मलकू पाटील कोटनाके, सत्तरशह कोटनाके, सदस्य,दक्षता समिती, कंटू कोटनाके, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस जिवती ,सिताराम मडावी महासचिव, जिल्हा युवक काँग्रेस, सलीम शेख, सचिव अल्पसंख्याक काँग्रेस, विकास सोयाम एव्हरेस्ट वीर, दिनेश सोयाम, महादू सोयाम व इतर पदाधिकारी यांनी चंदू कोटनाके कुटूंबियांना भेट देवून सांत्वना केली व एक छोटी आर्थिक मदत दिली.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...