खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ चे अध्यक्ष श्री.पाटकर साहेब प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे मार्गदर्शनात दिनांक ०२/१०/२०२१ ते १४/११/२०२१ या कालावधीत '"आजादी का अमृत महोत्सव"" साजरा करून देशाभिमान व्यक्त करण्यासाठी "पॅन इंडिया जागरूकता व पोहाच" या संकल्पनेतून सामान्य तडागळातील नागरिकांना कायद्याची व त्यांचे हक्क अधिकाराची जाणीव होण्यास कायदेविषयक जनजागृती
करण्यासाठी मोहीम आखली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तालुका विधी सेवा समिती, वणी यांच्यामार्फत वणी अधिवक्ता संघाचे वकील मंडळी, सह सरकारी वकील व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांची प्रभात
फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी हि वणी न्यायालयापासून ते वणीच्या मुख्य रस्त्याने काढण्यात आली. त्यामध्ये कायदेविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने विधी सेवा समिती मार्फत लोकअदालत चे महत्व पटवून देण्याबाबत तसेच वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार कायदा, रॅगिंग प्रतिबंधक कायदा यांसारख्या कायद्यांविषयी माहिती व जनजागृती करण्यासाठी कायदेविषयक माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
सदर प्रभात फेरीमध्ये वणी न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश श्री.चाफले, सह दिवाणी न्यायाधीश श्री.बोमिडवार व सह दिवाणी न्यायाधीश श्री.बछले, तसेच वणी वकील संघाचे अध्यक्ष श्री.कावळे, वकील संघाचे इतर पदाधिकारी वकील मंडळी, सरकारी वकील, न्यायालयीन कर्मचारी वृंद व पोलिस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सदर प्रभात फेरी नंतर विधी सेवा समितीचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश श्री.चाफले, सह दिवाणी न्यायाधीश श्री.बोमिडवार, सह दिवाणी न्यायाधीश श्री.बछले, वणी वकील संघाचे अध्यक्ष श्री.कावळे व इतर मान्यवरांनी राष्टपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान श्री.लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून नमन केले.
त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले व नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांनी आयोजित केलेला लोकार्पण सोहळा दूरचित्रवाहिनीच्या माध्यमाने अनुभवण्यात आला. अशाप्रकारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वणी शहरात प्रभात फेरीचे आयोजन करून तालुका विधी सेवा समिती, वणी यांचे मार्फत कायदेविषयक जनजागृती करत आजादी का अमृत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...