शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
वरोरा (चेतन लूतडे): कोविड मूळे महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याच चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने पूर्ण सीमा बंद करण्यात आलेले आहे. एखाद्या दुकानदाराला सुद्धा दुकान सुरु ठेवल्यास फाईन करण्यात येतो. मात्र अवैध तस्करी करणाऱ्या पांढरपेशीय वर्गातील व्यक्तीवर नाममात्र कारवाई होत आहे.
काही दिवसापूर्वी येवती येथे मोहसाठा व भट्टीसाहित्य पकडण्यात आला होता. या प्रकरणात सहा आदिवासी बांधवावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये चार आदिवासी बांधवावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे निवेदन उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम यांना देण्यात आले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली असून या प्रकरणातील लावलेले दारू प्रकरणातील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी उपजिल्हाप्रमुखानी केली आहे.
तर दुसरीकडे पोलीस प्रवीण रामटेके यांनी 208 पेटी विदेशी दारू वरोरा येथील बोर्डा चौकात पकडली होती. या प्रकरणात सर्व ताकतीनिशी पोलिस अधिकारीनी बंडू नामक तस्कराला वाचवण्याचा प्रयत्न केला. उलट दारू पकडल्या प्रकरणी प्रवीण रामटेके यांची वरिष्ठांकडून कानउघडणी सुद्धा करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम यांनी वरिष्ठांना व गृहमंत्रीना निवेदन सादर केले आहे. दोन्ही प्रकरणातील खऱ्या आरोपीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे जर पोलीस प्रशासन असमर्थ असेल तर शिवसेना स्टाईल दारू तस्करांना पकडून पोलिसांच्या हातात देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
या दोन प्रकरणांमुळे पोलिसांनी प्रतिमा मलीन झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरजेचे आहे. असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम यांनी सांगितले.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...