Home / आरोग्य / मूल तालुक्यात पुन्हा...

आरोग्य

मूल तालुक्यात पुन्हा एक झोला छाप डॉक्टर जेर बंद, वैद्यकीय विशेष पथकांची कार्यवाई 

मूल तालुक्यात पुन्हा एक झोला छाप डॉक्टर जेर बंद, वैद्यकीय विशेष पथकांची कार्यवाई 

झोला छाप डॉक्टरांमध्ये चागलीच खडबड

चंद्रपूर: मागील आठ वर्षांपासून कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र जवळ नसताना खासगी दवाखाना सुरू करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या देवकुमार ताराचंद बुधक या बोगस डाॅक्टरवर मूल पोलीस स्टेशन येथे शनिवार 15 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला . मूल तालुक्यातील नांदगाव येथे वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नसताना देवकुमार ताराचंद बुधक या बोगस डाॅक्टराने मागील अनेक वर्षांपासून नांदगाव येथे एका भाड्याच्या खोलीत दवाखाना सुरू केला होता . दरम्यान, नायब तहसीलदार यशवंत पवार, संवर्ग विकास अधिकारी डाॅ. मयूर कडसे आणि डाॅ. सुमेध खोब्रागडे यांनी आपल्या पथकासह नांदगाव येथे जावून देवकुमार बुधक यांच्या दवाखान्याची चौकशी केली असता, तांटिया विद्यापीठ श्री गंगानगर राजस्थान येथे बीएचएमएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती देवकुमार बुधक यांनी पथकाला दिली.
पदवी नसतानाही त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनात आले. यावेळी दवाखान्याची झडती घेतली असता, औषध आणि रुग्णांवर उपचार करणारे साहित्य मिळाले ते जप्त करून दवाखान्याला सील लावण्यात आली .येथील तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे कलम ४१९, २७६ भादंविसह महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम २००० कलम ३३ (१), ३३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने झोला छाप डॉक्टरांमध्ये चागलीच खडबड उडाली आहे.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

आरोग्यतील बातम्या

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...

सोमवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 1 बाधित ।। ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 130

चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

शुक्रवारी जिल्ह्यात 116 कोरोनामुक्त तर 63 नवे बाधित

चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...