*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी दि. 20 सप्टेंबर रोजी 05.00 वा. पासून ते दि. 21 सप्टेंबर रोजीचे 24.00 वा. पर्यंत पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास संपूर्ण जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी बंदी आदेश निर्गमित केला आहेत.
‘माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. त्याचे कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. दि. 18 सप्टेंबर 2021 रोजी कागल व कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहिर निषेध व्यक्त केला. बैठकीत डॉ. किरीट सोमय्या हे कोल्हापूर जिल्ह्यात येवू नयेत, ते कोल्हापूर जिल्हयात आल्यानंतर त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील. डॉ. किरीट सोमय्या हे कोल्हापूर वासियांना आव्हान देत आहेत, त्यांना त्याचे उत्तर कोल्हापुरी भाषेत दिले जाईल, खिंडीत गाठून गनिमी काव्याने कोल्हापूर हिसका दाखवला जाईल इ. मते व्यक्त केली आहेत.
तसेच दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. किरीट सोमय्या, यांचे कोल्हापूर जिल्हा मुदतीत हसन मुश्रीफ यांचे देखील कागल येथे आगमन होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी सुमारे 15 हजार ते 20 हजार जनसमुदाय सहभागी होण्याची शक्यता आहे. संरक्षित व्यक्ती डॉ. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावेळी जाणे-येण्याच्या मार्गावर ट्रॅक्टर, ट्रॉली, टिप्पर / डंपर, जे.सी.बी. अशा अवजड अथवा चारचाकी, दुचाकी वाहनांचा वापर करून अडथळा निर्माण करुन, तसेच गनिमी काव्याने धोका निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.’
त्यामुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व सर्वसामान्यांचे सार्वत्रिक हिताच्या
दृष्टीकोनातून विचार करता, दि. 20 सप्टेंबर 2021रोजी 05.00 वा. पासून ते 21 सप्टेंबर 2021 रोजी 24.00 वा. पर्यंत पाच किंवा पाच व्यक्तींना एकत्र जमण्यास संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये बंदी आदेश जारी होण्याबाबत पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी दर्शनास आणून दिले आहे, असे आदेशात म्हटले आहे.
हा आदेश सर्व शासकीय, निमशासकीय / शासनाशी संलग्न आस्थापना, त्याचप्रमाणे अतितातडीच्या धार्मिक विधी तसेच जिल्हा दंडाधिकारी यांच्या वतीने परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नसतील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, 269, 270, 271 अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद केले आहे.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....