Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / पेटुर जवळ भिषण अपघात,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

पेटुर जवळ भिषण अपघात, भरधाव मिनी बसने शेतकऱ्यासह एका बैलाला चिरडले..!

पेटुर जवळ भिषण अपघात, भरधाव मिनी बसने शेतकऱ्यासह एका बैलाला चिरडले..!

वणी (प्रतिनिधी): वणी- मुकुटबन मार्गावरील पेटुर गावाजवळ एका भरधाव मिनी बस ने शेतावरुन बैलांना घेऊन घराकडे परतणाऱ्या एका शेतकऱ्यासह बैलांना जोरदार धडक दिल्याने एका शेतकऱ्यासह एक बैल ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. देवराव दत्तुजी बोढाले(५५) रा.पेटुर असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मंगळवार दि.२४ ऑगस्ट ला देवराव बोढाले हे शतकरी दररोज प्रमाणे शेताचे काम करण्यासाठी शेतात गेले होते. दिवसभर शेतातील कामे आटपवुन सायंकाळी ७ वाजताचे सुमारास  बैलांना घेऊन घराकडे निघाले होते. दरम्यान पेटुर गावाजवळ येताच मुकुटबन कडुन सिमेंट कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन वणी मार्गे भरधाव जाणाऱ्या मिनी बस क्र.एमएच-३४ एबी-८२४६ ने देवराव बोढाले व एका बैलाला  जोरदार धडक दिली. या अपघातात देवराव बोढाले यांना गंभिर मार लागल्याने त्यांना वणी येथिल ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा म्रुत्यु झाला. तर बैलाला गंभिर मार लागल्याने बैलाचा ही म्रुत्यु झाला आहे. दरम्यान आज दि.२५ ऑगस्ट ला ग्रामिण रुग्णालयात देवराव बोढाले यांच्या म्रुत्युदेहावर शवविच्छेदन करण्यात आल्या नंतर नातेवाईकांनी म्रुत्युदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने ग्रामिण रुग्णालयात तनावाचे वातावरन निर्माण झाले होते.

यावेळी पोलीस प्रशासनासह आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, वणी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांच्या मध्यस्तिने तनाव शांत करण्यात यश मिळाले आहे. मिनी बस चालकांची विरुद्ध    २७९, ३०४,(अ),४२९,भादंवी सह कलम १३४(ऐ)(बी) मोटर वाहन कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास जमादार  ईरपाते करित आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...