Home / महाराष्ट्र / मोहाफुलांवरील निर्बंध...

महाराष्ट्र

मोहाफुलांवरील निर्बंध हटवण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मोहाफुलांवरील निर्बंध हटवण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दोन दशकांच्या प्रदीर्घ लढ्याला यश, उद्योग उभे राहून रोजगार निर्मितीला चालना मिळेल.

मुंबई (दि. ४ मे २०२१) :   मोहाफुलांवर सद्यस्थितीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ या कायद्या अंतर्गत असलेले निर्बंध हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. हा निर्णय व्हावा यासाठी १९९९ पासून आपण संघर्ष करत होते. आज या प्रदीर्घ लढ्याला यश आले आहे. या निर्णयाचा विदर्भातील जनतेला मोठा फायदा होणार असून यामुळे प्रक्रिया उद्योग आणि पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की,  राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता मोहाफुल गोळा करणे, बाळगणे व राज्यांतर्गत मोहाफुलांची वाहतूक करणे यावरील निर्बंध उठवले आहेत. आता यासाठी परवागीचीही आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे यंत्रणेकडून या व्यवसायातील आदिवासी बांधव, गरीब शेतकरी व संस्थांची यंत्रणेकडून होणारी पिळवणूक संपुष्ठात येईल. तसेच परराज्यात निर्यातीचे धोरण खुले ठेवल्यामुळे मोहफुले गोळा करणा-यांना योग्य दर मिळेल.

आदिवासी विकास विभागालाही मोहाफुले वापराकरिता नविन योजना तयार करण्यात येणार आहेत. या योजनांतर्गत मोहाफुलांच्या व्यापाराकरिता एफएफ-२ अनुज्ञप्ती आवश्यक असणार आहे. या अनुज्ञप्ती आदिवासी सदस्य असलेल्या आदिवासी विकास संस्था, महिला बचत गट, सहकारी संस्था, ग्रामपंचायत अशा प्रकारच्या मुंबई मोहाफुले अधिनियम १९५० मधील नियम २ सी नुसार मान्यताप्राप्त संस्थांना नविन एफएफ-२ परवाने मिळणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णयही आज गृहविभागाने काढला आहे.

विदर्भातील वनांसोबत शेतक-यांच्या शेतामध्येही मोठ्या प्रमाणात मोहाफुलांची झाडे आहेत. त्या शेतक-यांनाही आता उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे. मोहाफुलं गोळा करणे व व्यापावरील जाचक निर्बंध हटवल्याने विदर्भात मोहफुलांच्या झाडांच्या लागवडीला चालना मिळेल. यातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे रक्षणही होईल. तसेच मोहाफुलांवरील प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन जनतेला आर्थिक फायदा होणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...