आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
अकोला(प्रतिनिधी) :- पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली करीत,एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने पत्रकारांना धक्काबुक्की केल्याने,पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय निकम असे वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याचे नांव आहे.ही संतापजनक घटना मुंबईतील लालबागच्या राज्याच्या मंडप असलेल्या ठिकाणी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,१०सप्टेंबर रोजी, लालबागच्या राजाचा मंडप कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो, याठिकाणी कधी कार्यकर्त्यांमध्ये असलेले वाद, तर कधी पोलिसांचा अडेलतट्टू पणा वादाचा केंद्रस्थानी पहायला मिळत असतो,असाच प्रकार आज लालबागच्या राज्याच्या मंडपाच्या जवळ घडला आहे.
या ठिकाणी बंदोबस्त कामी आलेल्या पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत,तोंडाला मास्क न लावता, पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना संयमाने वागण्याची विनंती केली,त्यावर पोलीस निरीक्षक संजय कदम यांनी आता हात नाही तर पाय सुद्धा लावतो, अशा उर्मट भाषेत बोलून नव्या वादाला तोंड फोडलं आहे.या प्रकारावर साामाजि कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे याांनी तीव्र शब्दात या घटनेचा निषेध करीत, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.मुबंईतील परळ भागात येत असलेल्या लालबागच्या राजाच्या मंडपात घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाला असून,या घटनेला जबाबदार असलेले पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्यावर गृह विभागांने तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...