Home / चंद्रपूर - जिल्हा / झटपट न्यायदानातून जिल्ह्यात...

चंद्रपूर - जिल्हा

झटपट न्यायदानातून जिल्ह्यात 7671 प्रकरणे निकाली

झटपट न्यायदानातून जिल्ह्यात 7671 प्रकरणे निकाली

2021 मध्ये तीन राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन

चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारी प्रकरणे बघता, वेळेत न मिळणारा न्याय हा संबंधितांना एकप्रकारच्या अन्यायासारखाच वाटतो. यावर तोडगा काढण्यासाठी व नागरिकांना झटपट निकाल मिळण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधीसेवा, राज्य विधीसेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 2021 मध्ये तीन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.

1 ऑगस्ट, 25 सप्टेंबर आणि 11 डिसेंबर 2021 या तीन दिवशी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एकूण 7671 प्रकरणे निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकरणाच्या माध्यमातून 17 कोटी 94 लक्ष रुपये मुल्याच्या वादाबाबत तडजोड करण्यात आली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे ठेवण्यात आली होती.

या लोक अदालतीमध्ये नागरिक, विधिज्ञ तसेच विविध बँका, विमा, फायनान्स कंपनी यांचे अधिकारी आणि पक्षकारांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. आपले वाद आपसी समझोत्याने निकाली काढण्याकरीता  आपसात चर्चा करून सामंजस्याची भूमिका घेत तडजोडीने वाद मिटविले. परिणामस्वरूप या लोक अदालतीमध्ये न्यायालयीन प्रलंबित 2974 प्रकरणे आणि दाखलपूर्व 4697 प्रकरणे असे एकूण 7671 प्रकरणे निकाली निघाली. सदर प्रकरणांमध्ये एकूण 17 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या वादाबाबत तडजोड झाली. या राष्ट्रीय लोक अदालतीनिमित्त आयोजित स्पेशल ड्राईव्हमध्ये 2130 प्रकरणांचा यशस्वीरित्या निपटारा करण्यात आला.

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. लोक न्यायालयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे, यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्व संमतीने त्वरित समक्ष निकाल केला जातो व त्या आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्व असते व त्याची अंमलबजावणी सुद्धा करता येते. त्याद्वारे वेळ, पैसा, श्रमाची बचत होते. वादाचा कायमचा समोपचाराने निपटारा होतो. सर्वच पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात. या कार्यवाहीसाठी कोणतेही वेगळे शुल्क, खर्च लागत नाही.

जिल्ह्यातील तीनही राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वितेसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता बि. अग्रवाल, जिल्हा व सत्र न्यायाधीश विरेंद्र केदार, एस.एस.अन्सारी, प्रभाकर मोडक, प्रशांत काळे, एस.एस.मौंदेकर, के.पी.लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. याकरीता सर्व न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव किरण जाधव, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, चंद्रपूर जिल्हा विधिज्ञ मंडळाचे विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सहकार्य केले.
 

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...