वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मिळणाऱ्या"घरकुल" लाभार्थ्यांना तीन वर्षांचा कालावधी लोटूनही योजनेची संपूर्ण रक्कम मिळाली नसल्याने. आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडलेल्या घरकुल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर लाभार्थी नगरपरिषद कार्यालयाचे उंभरठे झीजवून अक्षरशः हताश झाल्याने ब्रम्हपुरी काँग्रेस कार्यकारिणीत पदाधिकारी असलेले श्री लक्ष्मणजी जिभकाटे व श्री प्रकाशभाऊ खोब्रागडे यांनी घरकुल लाभार्थ्यांचा गंभीर प्रश्न अनेक लाभार्थ्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देत न्यायिक मागणी केली आहे.
शासनाकडून लाभार्थी व्यक्तीला प्रारंभ प्रमाणपत्र देतांना असंख्य कठोर शासकीय नियमावलीच्या सूचना देत, संबंधित बांधकाम एक वर्षात पूर्ण करावे असे निर्देश असतात मात्र लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामानंतर तीन -तीन वर्ष पूर्ण लाभ मिळत नसल्याने काय करावे ...? शासनाकडून गरीब लाभार्थ्यांची होतं असलेली उपेक्षा लाजिरवाणी बाब आहे.
कुणी किरायाच्या घरात राहत आहेत.कुणी कर्ज काढून व्याज फेडत आहेत तर कुणी उसणवार घेतलेले पैसे कसे फेडावे या जाचात आहे. घरकुलचे पैसे मिळाल्यानंतर कर्ज चुकवू या आशेवर असलेले घरकुल लाभार्थी कोरोना सारख्या महामारीच्या संकटामुळे आर्थिक संकटात असल्याने शासनाने गरीब जनतेची थट्टा न करता न्याय द्यावे.
घरकुल लाभार्थी असलेल्या सामान्य जनतेच्या गंभीर विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी स्व:पक्षातीलच तरुण कर्तबगार कार्यकारिणीतील पदाधिकारी व्यक्तींनी पालकमंत्री व नगरपरिषद अध्यक्षा तथा बांधकाम सभापती यांना निवेदनाद्वारे न्यायिक मागणीची अपेक्षा केली तर न्याय देण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिल्याचे म्हटले आहे. लवकरच न्याय न मिळाल्यास आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सुद्धा प्रतिनिधीसह बोलतांना श्री लक्ष्मणजी जिभकाटे व प्रकाशभाऊ खोब्रागडे यांनी म्हटले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...