खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
७४ सोसायटी अध्यक्ष व सचिव, सदस्यांचा भव्य सत्कार.
भारतीय-वार्ता (वणी) : वणी- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ यांच्या वतीने सन. २०२०-२०२१ या वर्षात कर्जाची योग्य प्रमाणात वसुली करून बँकेला सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी ,सदस्यांचा सन्मान सोहळा दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी. शेतकरी मंदिर वणी येथे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा वामनराव कासावार हे होते. प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष देविदास काळे, बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, उपाध्यक्ष संजय देरकर, विभागीय अध्यक्ष राजीवरेड्डी येलटीवार, नरेंद्र पाटील ठाकरे ,सुरेश काकडे, प्रमोद वासेकर, प्रशांत गोहोकार, मोरेश्वर पावडे, पुरुषोत्तम आवारी, संदीप बुरेवार, प्रशासकीय अधिकारी गोंडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण दुधे साहेब, विभागीय अधिकारी किशोर बुच्चे, उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बळीराजा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने वणी विभागात ७५% टक्केच्या वर कर्ज वसुली करणाऱ्या ७४ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव पदाधिकारी व सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोगरे म्हणाले आपलीच माणस, आपल्या सेवेत शेतकऱ्यांचे हीत, हेच आमचे ब्रीद, हाच मुख्य धागा धरून सरकार कडून शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा विनाविलंब देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन देण्यात आले आहे . तसेच उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी बँकेमार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संजय देरकर म्हणाले शेतकरी बांधवाना जो विमा देण्यात येतो त्या संदर्भात विमा कंपनीकडून मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दिलीप अलोने यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी बंडू रासेकर यांनी मानले. कार्यमाचे यशस्वीत्यासाठी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण दुधे,विभागीय अधिकारी किशोर बुच्चे , व्यवस्थापक चामाटे साहेब तसेच सर्व बँकेचे व्यवस्थापक कर्मचार्यांनी पुढाकार घेतला.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...