भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : इ.स.१९४९ मध्ये एक युध्द लढले गेले होते. हो! युध्दच ते! जे की दिल्लीच्या सिंघू बाॅर्डर म्हणून नावलौकिक पावले.
सिंघू हा एका साधारण कुटुंबातील तरुण होता. शेती करुन उर्वरीत वेळेस तो आपल्या गावातील गोरगरिबांना मदत करीत असे. त्याचे हरियाणातील कवारत्न कैथल गाव आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील दिनदुबळ्यांचा तो 'मसिहा' होता. कसदार व पिळदार शरीरयष्टी असलेला सिंघू समोरच्यावर लगेच छाप पाडत असे.
चर्मकार समाजाच्या सिंघूचे सर्व जातीत मित्र होते. तो मदत करताना जात-पात बघत नसे. म्हणूनच त्याला इतर जातीतही मित्र होते.त्या काळी सिंघूच्या आसपासच्या गावांतील गाय, म्हैस,बैल, शेळ्या, उंट चोरीला जाऊ लागले. अशाच एका रात्री ३०० म्हशी, १६० उंट, २०० च्या जवळपास बैल व शेळ्या चोरी करुन दरोडेखोर दिल्लीच्या दिशेने चालले होते. या दरोडेखोरांची संख्या ५० च्या जवळपास होती. या दरोडेखोरांवर पाळत ठेवणा-या सिंघू व त्याच्या मित्रांना याची खबर लागली. लगेच लाठ्या- काठ्या जे हाताला लागले ते घेऊन सिंघू व त्याचे सहकारी मित्र पाई फुल्ला जाट, असंद मांगाराम, बुधराम पिपली,नन्तराम जाट, भलिया, सांता वाल्मिकी, केहरु रसिना, रोशन लम्बरदार, लिलाराम, बानूराम मतलौडा, बिल्लू गुर्जर, चंदू राजपूत, कालूराम वाल्मिकी, सिब्बाराम चमार, बनवारी लाल यांनी दिल्लीच्या बाॅर्डरवर जवळजवळ सात दिवस लढाई केली. आणि गरीबांचे पशूधन त्यांना परत केले. पोलिसांना मारामारीची खबर कळताच पोलिसांनी दरोडेखोरांना चोरीच्या आरोपावरून अटक केली तर सिंघू व सिंघूच्या मित्रांना मारामारी केली म्हणून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये चार महिने ठेवले व ती बाॅर्डर सील केली.
सिंघू व त्याचे मित्र जेलमधून सुटताच पानिपत, सोनीपत, घरौंडा, कवारत्न बलबेहडा, कैथल गावातील रजपूत, जाट, गुर्जर सर्वांनी त्यांचे जंगी स्वागत केले व गावागावातून मिरवणूक काढली.. कालांतराने तो रस्ता खूला करण्यात आला. त्यानंतरही सिंघूने अनेक लोकोपयोगी कामे केली. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्या बाॅर्डरला सिंघू बाॅर्डर नाव दिले. हा इतिहास सांगणारे संता गुर्जर शामली आता ९६ वर्षांचे आहेत. काही लोक त्याला विसरले असतील परंतु शेतकरी बांधवांनी ब्राह्मणी- भांडवली- सामंतशाही विरुध्द सिंघूबाॅर्डरवर लढा उभारुन पुन्हा एकदा सिंघूला स्मरण करण्यास भाग पाडले आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...