खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : वणी शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकातील नगर पालिकेच्या मालकीचे तब्बल १६० गाळे हरार्स करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या मुंबई नागपूर खंडपीठाने दिले असताना त्याच गाळे धारकांची नगरपालिकेकडे निवेदन देऊन गाळे हर्रास न करता मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे .त्यामुळे नगर पालिका सर्वसाधारण सभेत काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वणी शहरातील गांधी चौक परिसरातील सीट सर्व्हे क्रमांक १९ अ ,१९ ब, आणि १९ क या जागेवर व्यवसाय करण्याकरिता नाममात्र भाडेत्त्वाने गाळ्यांची निर्मिती करून व्यापाऱ्यांना दीर्घ मुदतीवर गाळे देण्यात आले होते . परंतु भाडे हे अल्प असल्याने नगर पालिकेने भाडे वाढ केली परंतु व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे नगर पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी गांधी चौकातील गाळे खाली करण्यात यावे व नगर रचना विभागाकडून आवश्यक मूल्यांकन काढून संपूर्ण गाळ्यांचा जाहीर हर्रास करण्यात यावा असा आदेश देण्यात आला.
त्यानंतर उच्च न्यायालयाचा गाळे हर्रास करण्याचा आदेश झालेला असताना येथील व्यापाऱ्यांनी गाळे हर्रास न करता मुदत वाढ देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन देऊन नगर पालिकेने हा विषय सर्वसाधारण सभेत आणला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होतो .अशा विनंतीचे निवेदन नागरिकांनी नगर परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी व सद्स्य याना दिले आहे.
वणी शहरातील किरकोळ व फळ विक्रेता संघ यांनी सुद्धा जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन न्यायालयाचे आदेशानुसार तातडीने गाळे हर्रास करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे . इतकेच नव्हे तर नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही व मा उच्च न्यायालयामध्ये प्रकरण चालू असल्या कारणाने गांधी चौकातील व्यापाऱ्यांच्या आलेल्या अर्जाबाबत विचार करता येणार नाही .त्यांची मागणी मान्य करता येणार नाही.
त्यामुळे गांधी चौक दुकान गाळे प्रकरणात झालेल्या मा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ निर्णया बाबतची माहिती उद्याच्या सर्वसाधारण सभेत देण्यात येईल असे मुख्याधिकारी यांनी त्यांचा पत्रात नमूद करून सांगितले आहे . त्यामुळे उद्या होणाऱ्या नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काय निर्णय घेते ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...