मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
हनुमान वॉर्ड देसाईगंज येथील नाल्यांचे पाणी रोडवर वाहु लागल्याने वार्डात दुर्गंधी
नितीन घुले (जिल्हा गडचिरोली प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांचा दिवसेंदिवस स्वच्छते विषयी असंतोष वाढतच असून आता हनुमान वॉर्ड देसाईगंज येथील श्री वैकुंट यांच्या घरासमोरील नालीतून वाहणारे दूषित पाणी आता रोडवरून वाहत असल्याचे चित्र आहे. नगरप्रशासन आणि स्वच्छतेचे कंत्राट दिलेले कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहराचा स्वच्छतेचा ठेका २ करोड १३ लक्ष मध्ये सदर ठेकेदाराला दिलेला आहे. काही दिवसापूर्वीच विविध वृत्तपत्रांमध्ये माजी नायब तहसीलदारांवर नाली स्वतः स्वच्छ करण्याची आली पाळी असे वृत्त आले होते. तरीसुद्धा नगरप्रशासन स्वच्छतेच्या संदर्भात एवढे निष्क्रिय कसे अशा कुजबुज सध्या संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून वरच्या पावसामुळे देसाईगंज परिसरात अनेक ठिकाणी कचरा हा जागचा जागीच कुजतांना दिसतोय, परिणामी त्यापासून दुर्गंधी निर्माण होऊन, ती शहरवासीयांना सहन करावी लागत आहे. यापासून विविध आजारांना सुद्धा त्यांना समोर जावे लागते आहे. याला जबाबदार कोण? शहराच्या विविध ठिकाणी कचरा जागचा जागीच कुजतोय? नाल्यांचे दूषित पाणी रोडवरून वाहत असून काही स्थानीक नागरीकांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाला स्वच्छतेविषयी निवेदन देऊन विनंती करण्यात आल्या तेव्हा, प्रशासन वेगवेगळे कारणे सांगुन ही नगरप्रशासनाच्या हद्दीत नसल्याचे उत्तर देऊन नागरीकांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक प्रशासन कधी जागे होणार?
याकडे देसाईगंज शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.
हनुमान वॉर्डातील नागरिकांनी आज फोनद्वारे विविध पक्ष्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून वॉर्डातील दुर्गंधी विषयी माहीती दिली आणि त्यांना समस्याचे निराकरण करून देण्याची विनंती केली. यावेळी माहिती घेतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्याम काका धाईत, पिंकुभाऊ बावणे युवक काँग्रेस शहर अध्यक्ष देसाईगंज, जिल्हा संघटक सचिव मनोज भाऊ ढोरे, विधानसभा संघटक सचिव मिलिंद भाऊ सपाटे, युवक शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दीपक नागदेवे, सामाजिक कार्यकर्ते राहुल सीडाम बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...
चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...
चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...