Home / आरोग्य / जिल्हयात एका मृत्युसह...

आरोग्य

जिल्हयात एका मृत्युसह 415 कोरोनामुक्त, 117 नवे बाधित

जिल्हयात एका मृत्युसह 415 कोरोनामुक्त, 117 नवे बाधित

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1452

चंद्रपूर दि. 4 फेब्रुवारी :  गत 24 तासात जिल्ह्यात 415 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 117 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर शुक्रवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 18, चंद्रपूर 15, बल्लारपूर 11, भद्रावती 3, ब्रह्मपुरी 19, नागभीड 10, मुल 1, सावली 5, पोंभूर्णा 4, राजुरा 4, चिमूर 2,वरोरा 11, कोरपना 5 व जिवती येथे 9 रुग्ण आढळून आले असून सिंदेवाही, गोंडपिपरी  व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये मुल येथील एका पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 194 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 95 हजार 189 झाली आहे. सध्या 1452 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 50 हजार 172 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 49  हजार 970 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1553 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

आरोग्यतील बातम्या

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...

सोमवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 1 बाधित ।। ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 130

चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

शुक्रवारी जिल्ह्यात 116 कोरोनामुक्त तर 63 नवे बाधित

चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...