वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
नांदेड : महाराष्ट्रात पंढरपूरनंतर प्रथमच विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. भाजपने पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर ‘पहेले पंढरपूर अब देगलूर’ असा नारा भाजपकडून दिला जात असताना, पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिले. कोंडलपूर येथे काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अंतापूरकर यांनी शिवसेना-भाजप युतीच्या सुभाष साबणे यांचा सुमारे २३ हजार मतांनी पराभव केला होता.
साबणे यांनी आता मूळ पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपकडून उमेदवारी मिळवली असून पोटनिवडणुकीत खरी लढत अंतापूरकर व साबणे यांच्यात होणार हेही स्पष्ट झाले. अंतापूरकर यांचा अर्ज ७ रोजी तर साबणे यांचा ८ तारखेला दाखल करण्यात येणार आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी मित्रपक्षांनी आपला पाठिंबा काँग्रेस उमेदवाराला दिला असला, तरी कोंडलवाडीच्या पहिल्या सभेला मित्रपक्षांच्या प्रमुख स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवली. दुसऱ्या बाजूला भाजपतही धुसफूस चालली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोमवारी सायंकाळी नांदेडमध्ये आले होते; पण ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांची भेट न घेताच ते मुंबईला रवाना झाले.
काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कोंडलवाडी येथून करण्यात आला. काँग्रेस पक्षाकडे चार-पाच इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती; पण जिल्हा काँग्रेसच्या शिफारशीनुसार जितेश अंतापूरकर यांचे नाव सोमवारी रात्री जाहीर केले. त्यानंतर इच्छुकांतील भीमराव क्षीरसागर आणि मंगेश कदम यांनी अंतापूरकर यांच्या उमेदवारीला सहमती दर्शवली.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...