Home / महाराष्ट्र / कोरोना रुग्णांच्या...

महाराष्ट्र

कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी हंसराज अहीर यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणा..

कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी हंसराज अहीर यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणा..

चंद्रपूर (प्रतिनिधी ): चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण हि चिंतेची बाब बनली असून कोरोनाच्या रुग्णांना बेड, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर करिता वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असतांना रुग्णांचे  तसेच त्यांच्या परिवाराचे हाल होत आहे.  कोरोनाची दुसरी लाट हि गंभीर स्वरूपाची असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरत आहे असे सांगतांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था अधिक प्रबळ करून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आवश्यक ती योग्य सुविधा करण्याची मागणी घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना काळ नियमांचे पूर्णतः पालन करीत स्वतः धरणे दिले. 

   सदर धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हंसराज अहीर पुढील मागण्या जिल्हा प्रशासनासमोर मांडणार आहेत :

- चंद्रपूर शासकीय महाविद्यालय महिला रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम, व्हेंटिलेटर, आयसीयू च्या व्यवस्थेसह ४०० बेड उपलब्ध असतांना ते त्वरित सुरु करावे.
- डॉक्टर्सची कमी सेवाभावी आयएमए शी चर्चा करून फिजिशियन, MBBS डॉक्टर्सची गरज आहे ती विनंतीवर मागणी करून सहकार्य घ्यावे.
- जिल्ह्यातील प्रमुख शहरातील चंद्रपूर महानगरासह खाजगी रुग्णालये बालरोग रुग्णालयासह अधिग्रहित करावे.
- वेकोलिचे माजरी, घुग्घुस, बल्लारपूर चे ३ हॉस्पिटल कोविड १९ साठी त्वरित अधिग्रहित करावे.
- लालपेठ हॉस्पिटल वेकोलिचे सामान्य रुग्णालयातील एक विभाग शिफ्ट करून त्याजागी कोविड १९ चे बेड वाढवा.
- रेमडेसिवीर इंजेक्शन ची कमतरता भासणार नाही अधिक मागणी करून उपलब्ध करून घ्यावे.
- जेष्ठ डॉक्टरांसह  BAMS / BHMS व अन्य प्रॅक्टिशनर डॉक्टर्सना कोविड १९च्या सेवेकरिता मदत घ्यावी.
- होम आयसोलेट परिवार व रुग्णांसाठी खोल्यांची अडचण पाहता मंगल कार्यालये, वसतिगृह, शाळा अन्य अधिग्रहण करून गरीब कुटुंबाना व्यवस्था करून घ्यावी. महानगर पालिकेने यात पुढाकार घ्यावा.

        प्रबळ आरोग्य सेवा हे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार असतांना जिल्हा प्रशासनाने सामान्य नागरिकांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या व वैद्यकीय सेवा सुदृढ करावी. प्रत्येक रुग्णाला योग्य ती वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे जेणेकरून जिल्ह्यातील भीतीचे वातावरण कमी होत रुग्णसंख्या आटोक्यात येऊन जिल्ह्याची कोरोनमुक्ती कडे वाटचाल होईल असे यावेळी अहीर यांनी सांगितले.  येत्या काही दिवसात  जनहितार्थ केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचे संकेत सुद्धा यावेळी हंसराज अहीर यांनी दिले.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...