रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
"गुढी पाडवा"
संकलन - रामचंद्र सालेकर: वसंत ऋतेचे आगमन,कृषिजीवनाशी निकटचा संबंध,निसर्गाबरोबरचे नाते,नवीन वर्षाचा प्रारंभ इ.कारणांनी चैत्र शुक्ल प्रतीपदेचे स्वागत करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करावा,या भावनेने गुढी पाडवा साजरा करणे वा न करणे,ही बाब ऐच्छिक आहे.गुढी पाडवा साजरा करू इच्छिणार्यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे.तथापि,त्या दिवसाकडे इतर दिवसांपेक्षा वेगळा असा शुभ मुहूर्त म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही.ज्यांनी गुढी भगव्या पताकेच्या वा अन्य एखाद्या स्वरूपात उभी करण्याची इच्छा असेल,ते तसे करू शकतात.ज्यांना हा सण साजरा करायचा नाही,त्यांना व्यक्तिगत पातळीवर तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे.परंतु त्यांनी शिवधर्म संसदेची परवाणगी घेतल्याशिवाय इतरांना तसे करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करता कामा नये.
"गुढीविषयी काही तपशील"
१)गुढी हा शब्द अस्सल देशी आहे.त्याचे मूळ संस्कृत भाषेमध्ये नाही.याचाच अर्थ हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला तत्सम वा तद्भव शब्द नाही.स्वाभाविकच,हा शब्द वैदिक परंपरेतील नसून बहुजनांच्या संस्कृतीमधील आहे.शब्द बहुजनांच्या संस्कृतीमधील असल्यामुळे त्याच्या मागची संकल्पनाही बहुजनांचीच आहे.कानडी भाषेमध्ये 'ध्वज' या अर्थाने 'गुडी' असा शब्द असून 'राष्ट्रध्वज' या अर्थाने 'नाडगुडी' असा शब्द आहे.ही गोष्ट देखील 'गुढी' हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला नसून मुळचा बहुजनांच्या आणि प्रामुख्याने दक्षिण भारतीय बहुजनांच्या भाषेतील आहे.हे दर्शविणारा आहे.
२)मराठी भाषेमध्ये गुढी हा शब्द सुमारे इसवी सनाच्या तेराव्या चौदाव्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते.उदा.-
संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटले आहे :
टाळी वाजवावी । गुढी उभारावी ।
वाट हे चालावी । पंढरीची ।।.....
दवंडी पिटे भावें चोखामेळा ।।
संत चोखोबांच्या अभंगातील चरण ।।
(श्री सकल संतगाथा,खंड १ला,श्री संतवाङमय प्रकाशन मंदिर,पुणे,प्रकाशक-रमेश शंकर आवटे,प्र.आ.१९२३दु.आ.१९६७,पृ.१२९)
संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे :
आइकैं संन्यासी तो चि योगी। ऐसी एकवाक्यतेची जगिं।
गुढी उभिली अनेकीं। शास्त्रांतरीं।।ज्ञानेश्वरी ६.५२।।
'स्मृतिस्थळ' हा महानुभाव साहित्यामधील ग्रंथ सुमारे १४ व्या शतकात लिहीला गेला आहे.या ग्रंथात 'गुढी' या शब्दाची 'गुढ्या' आणि 'गुढेया' ही रूपे पुढीलप्रमाणे आली आहेत :
१: आणि तुम्ही गुढ्यासरीसें यावे :(स्मृतिस्थळ ८३)
२: गुढेयासरिसें बैजोबा गाडेनिसिं निगाले:(स्मृतिस्थळ ८५)
'शिशुपाळवध' हा महानुभाव साहित्यातील एक महत्वाचा ग्रंथ होय.त्यामध्ये म्हटले आहे :
घेत स्पर्शसुखाची गोडी : श्रीकृष्ण आळिंगिला भुजादंडीं
तंव आत्मा उभितसे गुढी : रोमांचमीसें।।शिशुपाळवध ६०।।
(वरील उदाहरणांतील जाड ठसा मूळचा नव्हे)
राम आणि सीता यांचा विवाह झाल्यानंतर ते अयोध्यकडे निघाले असताना परशुराम आडवा आल्यानंतर राम आणि परशुराम यांच्यामध्ये झालेल्या संघर्पषात रामाने परशुरामाचा पाडाव केला.त्यानंतर दशरथांनी सर्व वर्हाडासह अयोध्येत प्रवेश केला.त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे.ध्वज पताका उभारल्या,म्हणजेच अयोध्यतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या,असा होतो.
कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामध्ये आनंदीआनंद झाला आणि त्या भरात लोकांनी गुढ्या उभारल्या,असे संत तुकारामांनी म्हटले आहे.
त्यांचा यासंबंधीचा अभंग पुढीलप्रमाने आहे :
गोकुळीच्या सुखा।अंतपार नाही लेखा।।
बाळकृष्ण नंदा घरीं।आनंदल्या नरनारी।।
गुढिया तोरणे।करिती कथा गाती गाणे।।
तुका म्हणे छंदें।येणें वेधिली गोविंदे।।२८३९.१-४।।
(जाड ठसा मुळचा नव्हे)
कृष्णाने कालीयावर मात केल्यानंतर त्याच्या गोपाळ मित्रांना अतिशय आनंद झाला.त्यांच्यापैकी जो चपळ होता,त्याच्या हातात गुढी देऊन कृष्णाने आनंदाची बातमी देण्यासाठी पुढे पाठविले,हे नोंदविताना तुकारामाने म्हटले आहे,
पुढ पाठविले गोविंदें गोपाळा।देउनि चपळा हातीं गुढी।४५५३.२।।
आनंदाची ही बातमी गोकुळात पोहचल्यानंतर तेथे काय घडले,ते सांगताना तुकाराम म्हणतात,
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं। चेंडू वनमाळी घेउनि आले।।
आली दारा देखे हरूषाची गुढी।सांगितली पुढी हरूषाची गुढी।सांगितली पुढी हरूषें मात।।४५५५.१,२।।
त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते,ते नोंदविताना तुकाराम म्हणतात,
नेणे वर्ण धर्म जी आली समोरी।अवघी च हरी आळिंगिली।।
हरी लोकपाळ आले नगरात।सकळांसहित मायबाप।।
पारणे तयांचे जाले एका वेळे।देखिले सावळे परब्रम्ह।।
ब्रम्हानंदें लोक सकळ नाचती।गुढिया उभविती घरोघरीं।।
घरोघरीं सुख आनंद सोहळा।सडे रंग माळा चौकदारी।।४५५६.१-५।।
संत तुकारामांनीच आणखी एकदा म्हटले आहे,
रोमांच गुढिया डोलविते अंगें।भावबळें खेळविती सोंगें रे।
तुका म्हणे कंठ सददित दाटे।या विठोबाच्या अंगसंगेंरे।।अ.क्र.१९२.५।। (जाड ठसा मूळचा नव्हे).
संत तुकारामांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला.छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म इसवी सन १६५७ मध्ये झाला.याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्ष आधी मरण पावलेल्या संत तुकारामांचे हे अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहीले गेले होते.
उत्तर भारतात चांद्रमास पौर्णिमेला संपतात,म्हणजेच तिकडचे चांद्रमास पूर्णिमांत असतात.दक्षिणभारतात चांद्रमास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सूरू होतो.या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो.'प्रतिपदा'या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे.त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय.
महाराष्ट्रातील निसर्गचक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचे मानले जातात.शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते.या पालवीला ग्रामीण भागात 'चैत्र पालवी' असे म्हटले जाते.याचा अर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस असल्यामुळे कृषीसंस्कृतीशी निगडीत आहे.
इसवी सन ७८ पासून 'शके' या कालगणनेचा जो प्रारंभ करण्यात आला आहे.त्या कालगणनेनुसार नव्या वर्षाची सुरूवात चैत्र शुक्ल प्रतीपदेला होते.
सौर पद्धतीच्या कालगणनेनुसार वर्षाची नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने 'शके' या कालगणनेचा स्वीकार केलेला आहे.या कालगणनेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस येतो.
गुढी पाडवा हा सण महाराष्ट्राप्रमाणेच कर्णाटक,आंध्र,गोवा आणि गुजरात या राज्यातूनही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो.
या दिवशी महाराष्ट्रात गुढीची पुजा केली जाते.तिच्या गळ्यात हार घातला जातो.हे पाहता या दिवशी गुढीचा अनादर केला जात नाही,तर तिच्याविषयी आत्यंतिक आदर व्यक्त केल्या जातो.
गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे,हा स्त्रियांचा अनादर असण्यापेक्षा मातृसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक समाजपद्धतीमध्ये स्त्रियांना जे प्राधान्य दिले जात होते त्याचे धोतक असण्याची शक्यता आहे.
गुढीच्या टोकावर पालथे ठेवले जाणारे भांडे हे राणीच्या मस्तकावर ठेवल्या जाणार्या मुकुटाचे प्रतीक असू शकते.
चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कडू लिंबाच्या पानांचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे करण्याची पद्धत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक,आंध्र,गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये आढळते.
या पानांचा थोडा का होईना रस चाखण्याची वा पिण्याची प्रथा या राज्यांमध्ये आहे.या दिवशी कच्च्या कैरीचे पन्हेही बनविले जाते.याचा अर्थ कडू आणि आंबट रस अनुभवले जातात.शिवाय गोड, तिखट, खारड आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात असतातच.याचा अर्थ,या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चवींचा आस्वाद घेतला जातो.मानवी जीवनातील सुख- दु:ख वगैरे प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे,असे वर्षाच्या पहिल्या दिवशी सुचविण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवांमुळे घडते,असे मानता येते.
।। जय जिजाऊ ।।
सौजन्य - शिवधर्म गाथा
संकलन - रामचंद्र सालेकर
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...