आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर, दि.6 जानेवारी : शहरातील बल्लारपूर रस्त्यावर निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाहणी करून येथील बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, बांधकाम करीत असलेल्या शापुरजी पालनजी कंपनीचे मुख्य अभियंता विनोद कुमार, अमसिध्द काझी, मोमीश राठी, अशोक गुप्ता आदी उपस्थित होते.
निर्माणाधीन असलेल्या महाविद्यालयात पाण्याची सुविधा व विद्युत पुरवठ्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. या दोन्ही बाबींसाठी विद्युत कंपनी आणि चंद्रपूर महानगर पालिकेने त्वरीत निविदा प्रक्रिया राबवावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व सोयीसुविधा युक्त इमारतींचे बांधकाम त्वरीत करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित कंपनीला दिले. यावेळी त्यांनी परिसरातील निर्माणाधीन असलेली मुख्य इमारत, निवासी वसाहत, वसतीगृह, आटोप्सी सेंटर, आयएमए इमारत आदींची पाहणी करून बांधकामाचा आढावा घेतला.
597 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला 19 मे 2019 रोजी सुरवात करण्यात आली. सद्यस्थितीत 50 टक्के काम पूर्ण झाले असून 287 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तसेच निवासी वसाहत असलेल्या टाईप टू, टाईप थ्री आदींचे बांधकाम पूर्ण झाल्याचे मुख्य अभियंता विनोद कुमार यांनी सांगितले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट : जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, विविध अद्ययावत शाखा व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा या महाविद्यालयात आहे. येथे जागा उपलब्ध असल्यामुळे स्कील डेव्हलपमेंट आणि स्टार्टअपचे प्रकल्प राबवा. प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला रोजगार मिळाला पाहिजे, याबाबतसुध्दा महाविद्यालयाने नियोजन करावे. परिसरातील अंतर्गत रस्ते व सुशोभिकरण करण्यासाठी निधी दिला जाईल. या महाविद्यालयात मिळणा-या सर्व सोयीसुविधा तसेच शैक्षणिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा, अशा सुचना केल्या.
पालकमंत्र्यांनी येथे असलेले इलेक्ट्रिक वाहन देखील चालविले. तसेच वर्कशॉप, रोबोटीक लॅब व विविध विभागांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. डायगव्हाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर आकोजवार, अधिष्ठाता डॉ. संजय राजूरकर, टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे अरुण कोहली यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...