खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
राजूर कॉलरी : जल, जंगल व जमीन ह्या तीन महत्त्वपूर्ण नैसर्गिक साधनांवर येथील मूलनिवासी किंवा येथील जनतेचा अधिकार असून ह्या साधनांवर कोणत्याही मूठभर लोकांचा अधिकार असता कामा नये, अशी भूमिका घेऊन उलगुलान म्हणजेच भांडवलदारी विचारसरणी च्या इंग्रजांविरुद्ध व जमीनदारी म्हणजेच सरंजामशाही विरुद्ध सशस्त्र उठाव करणारे शहीद वीर बिरसा मुंडा यांना त्यांच्या 15 नोव्हेंबर जयंती निमित्त येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे वतीने अभिवादन करण्यात आले.
शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या अल्प 25 वर्षाच्या जीवनात त्यांनी साम्राज्यवादी इंग्रज व जमीनदारी व्यवस्थेविरोधी सशस्त्र उठाव करीत मध्यप्रदेश झारखंड, छत्तीसगढ मध्ये जनतेला एकजूट करीत जल, जंगल व जमीन यावर आदिवासींना ताब्यात घ्यायला लावले व हे नैसर्गिक साधने कोण्या एकाच्या मालकीचे नसून त्यावर जनतेची सामूहिक मालकी आहे, हे सांगितले. त्यांचा हा विचारच महत्वपूर्ण असून त्यांना खरे अभिवादन म्हणजे मूठभर लोकांच्या नैसर्गिक साधनांवर होत चाललेले अधिकार ह्याचा विरोध करणे होय. आज संपूर्ण भारतात पेसा कायदा लागू असताना ग्रामसभेच्या निर्णय महत्वपूर्ण असतानाही जंगले ही भांडवलदारांना देण्यात येत आहे. हे सर्व संविधान, कायदे तुडवून केल्या जात आहे.
त्यामुळे बिरसा यांच्या विचार व त्यांच्या कृतीला अनुसरून ह्या सर्व बाबींचा विचार करून कृती करावी लागेल असे ह्या जयंती निमित्त झालेल्या अभिवादन कार्यक्रमात माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी व राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे लीलाधर अरमोरीकर यांनी आपले विचार मांडताना प्रतिपादन करीत जनतेला आवाहन केले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...