Home / चंद्रपूर - जिल्हा / संजय गांधी निराधार...

चंद्रपूर - जिल्हा

संजय गांधी निराधार योजनेच्‍या लाभार्थ्‍यांचे अनुदान गावोगावी थेट पोहचावे – मुनगंटीवार यांचे निर्देश

संजय गांधी निराधार योजनेच्‍या लाभार्थ्‍यांचे अनुदान गावोगावी थेट पोहचावे       – मुनगंटीवार यांचे निर्देश

सर्व बॅंकांना त्‍वरीत पत्र पाठविणार – तहसिलदार यांचे आश्‍वासन, घरकुल योजनेतील अडचणींच्‍या निवारणासाठी शिबीर आयोजित करणार

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही संपलेला नाही. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्‍या योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना त्‍यांच्‍या मासिक अनुदानासाठी बॅंकेसमोर रांगेत उभे राहतात. हे लाभार्थी वयोवृध्‍द, अपंग असतात. कोरोना काळात हे योग्‍य नाही. त्‍यामुळे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, साथरोग कार्यालयातील तरतुदीनुसार बॅंकांनी पूर्वीप्रमाणे गावोगावी लाभार्थ्‍यांपर्यंत पोहचून त्‍यांना अनुदान वितरीत करावे, असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. बैठकीच्‍या तासाभरानंतरच तहसिलदारांना सर्व बॅंकांना पत्र पाठवून कार्यवाहीचे निर्देश दिले.

दि. १५ जून रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीला पोंभुर्णाचे तहसिलदार, वि‍विध बॅंकांचे शाखा व्‍यवस्‍थापक, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, ईश्‍वर नैताम, नगर पंचायत मुख्‍याधिकारी सिध्‍दार्थ मेश्राम, मोहन चलाख, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, अजित मंगळगिरीवार, सुनिता मॅकलवार, पंचायत समिती सदस्‍य विनोद देशमुख आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. 

तहसिलदार पोंभुर्णा यांनी त्‍वरीत उदयाच सर्व बॅंकांना यासंबंधीचे पत्र पाठविण्‍यात येईल, असे आश्‍वासन आ. मुनगंटीवार यांना दिले. नवेगांव मोरे येथील बॅंक ऑफ इंडियाच्‍या व्‍यवस्‍थापकांनी पोलिस शिपाई उपलब्‍ध करण्‍याची मागणी केली असता त्‍वरीत पोलिस अधिक्षकांशी चर्चा करून पोलिस उपलब्‍ध करून देण्‍याचे आश्‍वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले. बॅंकासमोर मंडप टाकुन बसण्‍यासाठी खुर्च्‍या, पिण्‍यासाठी पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍याच्‍या सुचना भाजपा पदाधिका-यांनी दिल्‍या.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल बाबत अडचणी दुर करण्‍यासाठी शिबीर आयोजित करण्‍याच्‍या सुचना

प्रधानमंत्री आवास योजना तसेच शबरी आवास योजनेच्‍या आढावा देखील आ. मुनगंटीवार यांनी यावेळी घेतला. पंतप्रधान आवास योजनेच्‍या १६८ लाभार्थ्‍यांच्‍या डीबीआर मंजूर असून त्‍यातील बहुतांश प्रकरणे मान्‍य झाली असून काही प्रकरणांमध्‍ये आखीव पत्रीका, कार्यालयीन प्रकरणी काही अडचणी असल्‍याचे मुख्‍याधिकारी यांनी सांगीतले. तसेच शबरी आवास योजनेसाठी निधी प्राप्‍त असून तश्‍याच अडचणी या संदर्भात असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले. या अडचणींच्‍या निवारणासाठी एक शिबीर आयोजित करावे व त्‍यासाठी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच वकील यांना आमंत्रीत करण्‍याच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...