Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडवाना गणतंत्र पक्षाची...

चंद्रपूर - जिल्हा

गोंडवाना गणतंत्र पक्षाची भव्य कार्यकर्ता बैठक संपन्न

गोंडवाना गणतंत्र पक्षाची भव्य कार्यकर्ता बैठक संपन्न

विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा  पक्षात प्रवेश

जिवती: जिवती शहरातील गोंडवाना महाविद्यालय येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी तालुका जिवती च्या वतीने भव्य कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुक्यातील इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी गोंडवाना गणतंत्र पक्षावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला सदर  भव्य कार्यकर्ताा बैठक बापूराव मडावी जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कोर कमेटीचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, अब्दुल जमीर अब्दुल हमीद प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी, गजानन जुमनाके प्रदेश कार्याध्यक्ष युवा आघाडी, महेबुब भाई शेख प्रदेश प्रवक्ता,माजी सभापती भिमराव मेश्राम, कोरपना कृषी बाजार समितीचे संचालक ममताजी जाधव, सय्यद मुनीर जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी, युवा नेते संजु भाऊ, कृषी बाजार समितीचे संचालक निशिकांत सोनकांबळे,कुमरे मेजर,लक्ष्मण कुलसंगे, माजी सरपंच भिमराव सिडाम,सह आदिची प्रामुख्याने उपस्थिती होते.

या बैठकीत आगामी काळात येणाऱ्या निवडणुका, नगर पंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सोसायटीचे निवडणूक लढवायची याच्यावर चर्चा करण्यात आली, तळागाळातील लोकांना घेऊन गाव तेथे शाखा,घर-घर कार्यकर्ता अशी चर्चा करून पक्षाची मोठ बांधण्याचे निर्धार व्यक्त करण्यात आला सदर भव्य कार्यकर्ताा बैठकीत जेष्ठ नेते ममताजी जाधव यांची जिवती तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली, उपाध्यक्ष पदी अनंता बावळे,सत्तार शेख,सोनेराव पेंदोर, सचिव पदी भिमराव मेश्राम, हनुमंत कुमरे, आनंदराव शेडमाके, नामदेव जुमनाके यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच जिवती शहर अध्यक्ष पदी शमशोददीन शेख, शहर युवक आघाडी अध्यक्ष जंगू वेट्टी, उपाध्यक्ष केशव कोहचाळे, कार्याध्यक्ष क्रिष्णा सिडाम, युवा आघाडी सचिव पदी अजिम सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी तालुक्यातील इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केले अनील येवले,सुशिल गायकवाड,खायम अब्बास अली, शेख,भिल्लाजी उईके,सह अनेक कार्यकर्त्यांनी गोंडवाना गणतंत्र पक्षात जाहीर प्रवेश केले, या प्रसंगी मारोती बेल्लाळे नगरसेवक, भिमराव पाटील जुमनाके, प्राध्यापक लक्ष्मण मंगाम, केशव कुमरे, नारायण मोगीलवार,मतीन शेख,रवि कन्नाके, उत्तम पवार, शंकर सिडाम, तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भव्य कार्यकर्ता बैठक सोहळा संपन्न झाला.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...