Home / महाराष्ट्र / सारथी संस्था 'बंद' करून...

महाराष्ट्र

सारथी संस्था 'बंद' करून महाराष्ट्रातील तारादूतांना देशोधडीला लावण्याचा महाआघाडी सरकारचा डाव :संतोष शिंदे

सारथी संस्था 'बंद' करून महाराष्ट्रातील तारादूतांना देशोधडीला लावण्याचा महाआघाडी सरकारचा डाव  :संतोष शिंदे

संतोष शिंदे यांची मागणी

 

 पुणे(भारतीय वार्ता):  सारथी संस्था 'बंद' करून तारादूतांना देशोधडीला लावण्याचा प्रकार महाआघाडी सरकारने करू नये...  अन्यथा, गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. ४८० तारादूतांना तात्काळ नियुक्त्या द्या... महाराष्ट्रातील मुलांच्या जिवाशी कोणीही खेळू नये, अन्यथा यानंतर आम्ही बारामतीत आंदोलन करू... अशी मागणी आज आंदोलनात संभाजी ब्रिगेड'चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली.

सारथी संस्थेचे प्रमुख जबाबदारी सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडे आहे. मात्र तरीही सारथी संस्था किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यात आलेले नाही. तारा दूध म्हणून मुला-मुलींच्या नेमणुका झाल्या मात्र त्यांना एक वर्ष उलटून गेले असताना सुद्धा नियुक्त्या दिल्या नाहीत. हे ठाकरे सरकारचे अपयश आहे. याउलट प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे 17 मार्च रोजी तारादूतांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. असा अजब फतवा सरकारच्या वतीने काढण्यात आला हे निषेधार्ह आहे. राज्यातील तरुणांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. तारादूत प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी सारथी कार्यालयासमोर तारादूतांचे वर्षातून दुसरे ठिय्या आंदोलन सुरू आहे. महिला सक्षमीकरण सामाजिक जाणिवा मराठा समाजासाठी सुरू असलेल्या आंदोलनास संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे, जर वेळेत मागण्या मान्य झाल्या नाहीतर संभाजी ब्रिगेड च्या स्टाईल सगळ्या ४८० तारादूत मुला-मुलींना घेऊन बारामतीत आंदोलन करण्यात येईल.

सारथी संस्थेसमोर तारादूतांच्या नियुक्त्या कराव्यात म्हणून पुण्यात शेकडो मुले व मुली आंदोलन करत आहेत. त्याठिकाणी त्यांच्याकडे राहण्याची व खाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत मुले कुडकुडत आंदोलनाला बसलेले आहेत. मात्र सारथी संस्था प्रशासन व मुख्य व्यवस्थापक मा. अशोक काकडे विद्यार्थ्यांना कुठलीही मदत करत नाहीत किंवा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा देखील करत नाही. कदाचित विद्यार्थ्यांच्या जीवावर हे आंदोलन बेतू शकते...

सारथी संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यंत ग्रामीण भागात गावा गावा पर्यंत पोहोचण्यासाठी तारादूतांच्या नेमणूका करण्यात आल्या, मात्र त्यांना नियुक्त न देणे हे सरकारचे अपयश आहे.

संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महादेव मातेरे, मंदार बहिरट, विनायक घुले, मोहिनी रणदिवे, अतुल येवले, निलेश ढगे, बाळू थोपटे, पप्पू पांडव व जयदिप रणदिवे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...