Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांना लागल ठेकेदारीचं वेड..!

ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांना लागल ठेकेदारीचं वेड..!
ads images

झरी तालुक्यातील विदारक चित्र, ग्रामविकासाच्या नावावर ठेकेदारीतून पैसा कमविण्याच्या प्रयत्न

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी): तालुक्यात 55 ग्रामपंचायत व एक नगरपंचायत असून शेकडो पुरुष -महिला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच ,उपसरपंच व सदस्य म्हणून पदावर आहे. 80 टक्के ग्रामपंचायत वर महिलाराज असून बहुतांश सरपंचाचे पतीदेवच स्वतःला सरपंच म्हणून वावरत असून ग्रामपंचायतचा कारभार सुद्धा पाहत आहे. या पतीराजमुळे महिला सक्षमीकरणाला खीळ लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.महिला सरपंचाचे पती सरपंच आहेच परंतु सदस्य सुद्धा त्यापेक्षा वरचढ झाले आहे.
तालुक्यातील अनेक महिला सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचे पतीशासकीय ,निमशासकीय, सोसायटी, संस्थेवर नौकरीवर आहे तर काही जिल्हा परिषद शिक्षक सुद्धा आहे. हे कर्मचारी ग्रामपंचायतच्या अनेक कामात मोबाईल द्वारे व बाहेर मिटिंग घेऊन ढवळाढवळ करतांना दिसत आहे. तसेच ग्रामवासीयांच्या तक्रारींवर स्वतःच मोबाईलवरून संभाषण करून सोडविण्याचे बोलतात. नियमाने शासकीय कर्मचारी यांना राजकारणात सहभाग घेता येत नसतांना  छुप्या मार्गाने  असे प्रकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक गावात दोन तीन पॅनल लढतांना दिसतात तर अपक्ष उमेदवारही असतात. व निवडणुकी दरम्यान लाखो रूपये खर्च करून निवडून येतात. निवडून येताच निवडनूकीत लागलेला खर्च काढायचा कसा याचे विचार सुरू होऊन गावातील होणाऱ्या सर्व कामाची ठेकेदारी स्वतःच करून पैसा लाटण्याचा निर्णय घेतला जातो. अशा प्रकारची बाब तालुक्यात पहायला मिळत आहे. नियम धाब्यावर बसवुन टेंडर म्यानेज करणे,जवळील नातेवाईक ,भाऊ किंवा स्वतः कामे घेऊन पैसा कमविण्याच्या गोरखधंदा सुरू झाला आहे. 

ग्रामविकास करिता खासदार,आमदार,जिल्हा परिषद ,पंचायत समिती व इतर विभागातर्फे तसेच विविध योजनेअंतर्गत लाखो रुपये रस्ते,वीज,पाणी व गावातील विविध विकास कामाकरिता निधी मिळतो. ग्रामपंचायत पातळीवर विकासकामे करण्याकरिता ठराव घेऊन मंजुरात घ्यावे लागते.तसेच मंजूर कामाचे इस्टीमेट तयार करावे लागते, 15 लाखाच्या वरील कामाचे ई टेंडरिंग करावे लागते. तर काही कामे ग्रामसभेत मंजूर करून घ्यावे लागते.परंतु असे नियमाचे पालन बहुतांश ग्रामपंचायत मध्ये होतांना दिसत नाही. मिटिंग व ग्रामसभेच्या स्वाक्षऱ्या घरी जाऊन घेतल्या जातात व मिटिंगचा कोरम पूर्ण झाल्याचे दाखविल्या जाते अशी ओरड ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी करीत असल्याचे ऐकायला मिळत आहे.. व स्वतःला ते काम कसे मिळेल याकरिता सचिव यांना पकडून धावपळ करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राजकारण करून ग्रामविकास ऐवजी स्वतःचा विकास करण्याचे प्रयत्न अनेक सरपंच, उपसरपंच व सदस्य करण्याच्या तयारीत दिसत आहे. काही ग्रामपंचायत मध्ये तर लोकप्रतिनिधीना पकडून पंचायत समिती ,सचिव पातळीवर दबाव टाकून ठेकेदारी करून पैसा कमविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा सरपंच, उपसरपंच व सदस्यांमुळे खरच गावाचा विकास होणार का ? असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...