Home / महाराष्ट्र / सुुपर स्पेशालीटी हॉस्पीटलची...

महाराष्ट्र

सुुपर स्पेशालीटी हॉस्पीटलची उर्वरीत इमारत कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे निर्देश..

सुुपर स्पेशालीटी हॉस्पीटलची उर्वरीत इमारत कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे निर्देश..

संदीपान भुमरे यांची पालकमंत्री पदी नेमणुक

यवतमाळ (प्रतिनिधी ): यवतमाळ सुुपर स्पेशालीटी हॉस्पीटलची उर्वरीत इमारत कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने नुकतेच निर्देश दिले आहे. कोविड 19 कोरोनाचे महाभंयकर संकट जगासह देशातील महाराष्ट्रामध्ये आले असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून शासकीय व खाजगी कोविड रूग्णालय रूग्णांच्या उपचाराकरीता कमी पडत आहेत. रूग्णांना उपचार मिळण्याकरीता शासनासह जिल्हा प्रशासन प्रयत्नरत आहे.
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती लोकसंख्येमुळे श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रूग्णालयाच्या पाच मजली सुपर स्पेशॉलीटी हॉस्पीटलच्या सर्व सुविधा असलेल्या अद्यावत इमारतीचा पाच पैकी सध्यास्थितीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील अर्धा भाग, तिसरा व चवथा भाग असे अर्ध्याच इमारतीमध्ये कोरोना रूग्णांचे उपचार सुरू असून उर्वरीत अर्धी इमारत रिकामी आहे. याकरिता मा. ना. राजेशजी टोपे (आरोग्य मंत्री), मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे मुख्य सचिव विकासजी खारगे तसेच वैद्यकीय सचिव श्री सौरभजी विजय यांच्याकडे पत्र व्यवहार करून व भ्रमणध्वनीवरून बोलून सुपर स्पेशॉलीटी रूग्णालयाच्या उपयोगात नसलेली अर्ध्या इमारत कोविड रूग्णांच्या उपचाराकरीता वापरल्यास ज्यात 250 ते 300 कोरोना रूग्णांची व्यवस्था होवू शकते. ती सुरू करण्याविषयी बोलणे झाल्यानंतर मा. ना. राजेशजी टोपे, मा. मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव, वैद्यकीय सचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सदरची इमारत कोविड रूग्णांच्या उपचाराकरीता सुरू करण्याचे निर्देश दिले असून सुपर स्पेशालीटीची उर्वरीत अर्धी इमारत कोवीड रूग्णांकरीता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच मा. मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेबांना खासदार भावनातार्इंनी आज भ्रमणध्वनीवरून चर्चा करून 16 तालुक्याचा जिल्हा असलेला यवतामळ जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे कोविड 19 कोरोना संकटामुळे निर्णय घ्यायला अडचणी येत आहेत. करीता अशा सर्वभौम कोरोनाच्या संकटामध्ये पालकमंत्री देण्यात यावे, अशी विनंती केली असता मा. मुख्यमंत्री महोदयांनी त्वरीत दखल घेवून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे रोजगार हमी फलोउत्पादन मंत्री मा. ना. संदीपानजी भुमरे यांची नेमणुक केली. 

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...