Home / महाराष्ट्र / सरकारने शिवजयंतीचे...

महाराष्ट्र

सरकारने शिवजयंतीचे सर्व निर्बंध हटवावे...

सरकारने शिवजयंतीचे सर्व निर्बंध हटवावे...

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन...

भारतीय वार्ता (प्रतिनिधी):  महाराष्ट्रात सर्व नागरिक  सरकारचे सर्व नियम पाळून समारंभ घेत आहे. राज्यात शिवजयंती आनंदाने साजरी करण्याचे नियोजन पूर्ण झालेले आहे. मात्र कोरोना (Covid -19) चे कारण देऊन सरकारने यावर्षी गर्दीचे कारण देऊन 'शिवजयंती' कार्यक्रम रद्द करण्यात निर्णय घेतला असून तसा औरंगजेबी 'फतवा' सरकारने काढला आहे. या फतव्याचा व ठाकरे सरकारच्या निर्णयाच्या विरोधात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या आज धरणे ? आंदोलन करण्यात आले.

सगळीकडे गर्दी होतच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू आहे, पोलिस त्यांना परवानगी देतात... शिवजयंतीला मात्र बंदी घातली जाते. भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते महाराष्ट्र पश्चिम बंगाल'सह देशभर फिरत आहेत... त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते. तसेच काँग्रेस व शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री महाराष्ट्रभर शेकडो लोक घेऊन फिरतात, कार्यक्रम घेतात मात्र पोलिस त्यांना परवानगी देतात आणि सरकार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला बंदी घातली जाते... हे निषेधार्ह आहे. पदवीधर व ग्रामपंचायतीच्या निवडणुका जोरात झाल्या मग शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी का...? महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते. सगळ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम केले जातात. एक चांगला संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न प्रत्येक शिवप्रेमी करतो. अशा या सुंदर कार्यक्रमावर महाराष्ट्रचे सरकार जर बंदी घालत असेल तर ते निषेधार्ह आहे. सरकारने काढलेला फतवा तात्काळ पाठीमागे घेऊन शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सरसगट परवानगी द्यावी... वेळ पडली तर 'मिरवणूका रद्द करा, मात्र कार्यक्रम झाले पाहिजेत...' अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. सरकारने काढलेल्या या फतव्यात विरोधात महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमी प्रचंड संतापलेला आहे. म्हणून सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून तात्काळ बंदी उठून परवानगी द्यावी... असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी आज व्यक्त केले.

शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद घालणाऱ्या शिवजयंती चे महत्व काय कळणार...! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंती चे कार्यक्रम अतिशय दिमागात, चांगल्या पद्धतीने घेणाऱ्या शिवप्रेमींच्या मनाच्या विरोधात जर हे सरकार जाणार असेल किंवा वाद निर्माण करण्याचा, यांची जर नियत असेल तर हे सरकार शिवद्रोही आहे हे यांच्या निर्णयावरून स्पष्ट होते. सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा अशी महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमी ची इच्छा आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, निलेश ढगे, बाळू थोपटे, शिवप्रेमी वंदना भोसले, स्मिता साबळे, मोहिनी रणदिवे, शिवाजी पवार, दिनकर केदारी, हनुमंत गुरव, रमेश गणगे व सहकारी... उपस्थित होते. 

- संभाजी ब्रिगेड, पुणे जिल्हा महाराष्ट्र

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...