*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
प्रज्वल मटाले (शब्द्धांकन व रचना) : तो अवघे १४ वर्षे वयाचा होता. घराच्या परिसरात साप आढळला. हा साप चावेल किंवा इजा करेल या हेतूने परिसरातील नागरिकांनी काठीच्या सहाय्याने त्या सापाला जंग जंग पछाडलं आणि सरते शेवटी अतिशय क्रूरतेने त्याला मारुन टाकलं. त्यानंतर आसुरी आनंद झाल्यासारखे सर्वजण हसत होते किंवा उड्या मारत होते. तो प्रसंग त्याने पाहिला आणि त्याचे मन हेलावले. सापासारखे सरपटणारे प्राणी हे सुद्धा जीवच आहेत. मग, त्यांना अशी वागणूक का. घरात, शेतात कुठेही साप आढळला तर त्याला अशी वागणूक आणि तेच मंदिरात गेले तर तेथे सापाची पुजा. ही काय पद्धत आहे. सापांच्या संरक्षणासाठी आपणच काही तरी करायला हवे, असा चंग त्याने बांधला. आज तो २२ वर्षाचा, या ७ वर्षाच्या काळात त्यांनी जवळ पास ३००० हजार साप पकडून त्यांना जीवन दान दिले अशा या सर्प मित्राचे नाव गोलू चौधरी(वय २२)आहे.
बेलोरा येथील असलेला गोलू चौधरी हा बेलोरा, निलाजई , नायगाव ,पुनवट व वणी ग्रामीण भागामध्ये साप पकडण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. व्यवसायाने सलून चालवणारा गोलू हा आमच्या घरात किंवा परिसरात साप निघाला आहे कृपया तातडीने मदत करा, असा फोन वनविभाग किंवा गावकऱ्यांकडून आला असता तो तातडीने मोहिमेवर निघतो.
आजही किमान ५ ते १० फोन त्यांना दिवसभरात येतात. कसलाही विचार न करता तो मदतीसाठी तत्पर असतो. त्यामुळेच तो वणी ग्रामीण भागामध्ये तो अतिशय लोकप्रिय आहेत. तातडीने मदत करणारा सर्पमित्र ही त्यांची ओळख बेलोरावासीयांमध्ये व वणी ग्रामीण भागामध्ये बनलेली आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कुठलीही काठी किंवा हत्यारांची मदत न घेता तो सापाला पकडतो. हो अगदी विषारी साप किंवा नाग असला तरीसुद्धा. सर्वसामान्यांना मदत करणे, सापांच्या संरक्षणासाठी धावून जाणे आणि सापांविषयी जनजागृती करणे हे ध्येय बाळगून गोलू काम करीत आहेत. त्याची दखल वेगवेगळ्या पातळ्यांवर घेतली जात आहे.
वाढते शहरीकरण, घटणारे जंगल, कमी होणारे शेतीचे क्षेत्र, वाढता मानवी हस्तक्षेप अशा विविध कारणांमुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष बळावतो आहे. यामुळे मानव अधिक हिंसक होतो आहे आणि वन्यप्राण्यांचे अस्तित्व अधिकाधिक संकटात येत आहे. तसेच, या संघर्षातून मोठी हानी होते आहे, या साऱ्या प्रकाराने गोलू अतिशय व्यथित होतो. हा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी तो आग्रही आहेत. सापांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्यावर प्रेम करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, देवाने आपल्याला पाठविले आहे, असे गोलू यांना वाटते. त्यामुळे दिवसरात्र त्यांची सर्प सेवा, सुरक्षा सुरू असते. सर्पमित्र म्हणून त्याची आता पर्यंत ची कारकिर्द अतिशय भरगच्च अशी आहे. आजवर त्यांनी ३००० हून अधिक साप पकडले आहेत. ३००० हजाराहून अधिक भटकलेल्या सापांचा (स्ट्रेइंग स्नेक्स) त्यांनी बचाव करुन पुन्हा त्यांना सुरक्षित जंगलात सोडले आहे. असे असतानाही सापांविषयी त्यांचे ममत्व तसूभरही कमी झालेले नाही. याउलट सापांच्या बचावासाठी तो आक्रमक च राहिला आहे.
केवळ सापांना वाचविणे आणि जंगलात सोडून देणे हेच काम तो करतात असे नाही. विविध प्रकारच्या सापांविषयी असलेले त्याचे अचूक आणि अगाध ज्ञान थक्क करणारेच आहे. सापांच्या प्रेमात तो का पडला हे त्यालाही निटसे सांगता येत नाही. पण, सापांसाठीच आपण या पृथ्वीतलावर आलो आहोत, याची जाणिव त्यांना सतत वाटते. गोलू हा अवघे १४ वर्षे वयाचा होता तेव्हा त्यांनी पहिला साप पकडला होता. त्यानंतर त्यांचा विश्वास वाढत गेला आणि मदत करण्याची त्यांची हातोटी अव्याहत सुरू आहे. तो कुठेही असला आणि त्याला मदतीसाठी फोन आला तर तो जातोच. सापाला कुठलीही इजा व्हायला नको हा प्रमुख उद्देश त्यामागे असल्याचे गोलू सांगतो . त्यामुळे हे ऐकून त्यांच्याविषयी आणि सापांविषयी सर्वसामान्यांमध्ये आस्था, आदर निर्माण होतो. त्याच्या या कार्यशैलीची महती सर्वदूर गेल्याने तातडीने गोलू यालाच पाचारण केले जाते. गेल्या काही वर्षात नागरिकरण वाढत आहे. जंगलांचा आकार कमी होतो आहे. त्यामुळे मानवी वस्तीलगत साप आढळून येतात. साप हा सुद्धा एक जीवच आहे. आपल्या संस्कृतीचा विचार केला तर सापांची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. ज्यावेळी त्याला धोका किंवा असुरक्षितता वाटते तेव्हाच तो दंश करतो. ही बाब आपण समजून घ्यायला हवी, असे गोलू सांगतात. तो सापांना सुरक्षित वातावरणात सोडतात.
गोलू चौधरी यांच्या कार्याची दखल घेऊन त्याला सरकारी नोकरी देऊ केली पाहिजे अशी जनतेची भावना व्यक्त होत आहे. गोलू यांचे सर्पप्रेम पाहून जनता सुद्धा थक्क राहतात. अश्या या आमचा मित्र गोलू चौधरी व इतर सर्पमित्र म्हणून कार्यरत असणाऱ्या व प्रसिद्धी साठी कधी हि काम न करणाऱ्या आमच्या सर्पमित्राला सर्पदिनाच्या खूप खूप शुभेच्या.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...