Home / महाराष्ट्र / डॉ बाबासाहेब आंबेडकर...

महाराष्ट्र

डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील गलथान कारभार आणि भ्रष्ट प्रशासन,अवैध गुंडगिरीच्या बळावर महाविद्यालयाचा ताबा घेतलेल्या भारतातील पहिले महाविद्यालय महाड.

डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील गलथान कारभार आणि भ्रष्ट प्रशासन,अवैध गुंडगिरीच्या बळावर महाविद्यालयाचा ताबा घेतलेल्या भारतातील पहिले महाविद्यालय महाड.

भारतीय-वार्ता (महाड प्रतिनिधी):  स्टुडंट् असोसिएशन या जबाबदार विद्यार्थी संघटनेचा प्रवक्ता म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील गलथान कारभार आणि भ्रष्ट प्रशासन ,अवैध गुंडगिरीच्या बळावर महाविद्यालयाचा ताबा घेतलेल्या प्रवृत्ती विरोधात आम्ही लढा देतोय.महाड हे ऐतिहासिक व सामाजिक वारसा लाभलेलं शहर आहे.या शहरात बाबासाहेब यांच्या नावाने स्थापन झालेल भारतातील पहिले महाविद्यालय आहे.आंबेडकरी बहुजन समाजाची शैक्षणिक अस्मिता असलेल्या महाविद्यालयाची आज काय अवस्था आहे.कधी विचार केलात समाजबांधवांनो .. नाही ना..करणारच नाही आपण विचार.कारण आपण सर्व जण राजकीय पर्याय शोधण्यात इतके व्यस्त झालोय की आपल्या ज्ञानसूर्याने स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत महाविद्यालयाची आज वाताहत होतेय आणि आपण समाजातील सुशिक्षित विचारवंत कार्यकर्ते लोक डोळे मिटून शांत बसलोय.२० मार्च १९२७ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह करून मानवमुक्तीच्या लढ्याला सुरूवात केली.आज त्यांच्याच नावाने स्थापन करण्यात आलेल्या महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यापासून ज्ञानसूर्याच्या लेकरांना प्रतिबंध केला जातोय .पोलीस प्रशासनाचा वापर करून ,तर कधी कोरोनाचे कारण करून आंबेडकरी व बहुजन समाजाची मुस्कटदाबी केली जातेय .करोडो रूपयांचा भ्रष्टाचार दिवसाढवळ्या करण्यात येतोय.बौध्द समाजाला वठणीवर आणेन,समाजातील चार पुढा-यांना पैसे फेकले की ते माझ्याच मागे उभे रहातात अशी दर्पोक्ती करून हे माझं काॅलेज आहे , तुम्हाला बाबासाहेब यांच्या फोटोला हार घालू दिला हेच तुमचं नशिब समजा ,तुमचं आयुष्य बरबाद करून टाकेन,तुझी लायकी काय ,असे धमकी देऊन जातीयवादी मानसिकता दाखवून दिली जात आहे.हे सर्व करतय कोण ? गुंड धनाजी गुरव ,मुलींची छेड काढणारा त्यांचं शोषण करणारा राकेश सोनार ..ही दोन संस्पेड माणसं संपूर्ण महाविद्यालय वेठीस धरत आहेत.आजही दररोज लाखो रूपयांचा भ्रष्टाचार होतोय.आता वेळ आलीय बांधवांनो भीमा कोरेगाव युध्दाच स्मरण करण्याची . आता एकदिलाने गुंड धनाजी गुरव ,राकेश सोनार आणि त्यांच्या साथीदारांवर प्रशासकीय एल्गार करण्याची . आम्ही कंबर कसलीय या भ्रष्ट व गुंड वृत्तीच्या धनाजी गुरव राकेश सोनार यांना महाविद्यालयातून हद्दपार करणारच ..आमचा लढा सुरूच राहिलं ..माझी अस्मिता ..माझं काॅलेज .. 

महाविद्यालय बचाव करण्यासाठी 
आंबेडकर स्टुडंट् विद्यार्थी संघटनेचा लढा दि. १६/१०/२१ रोजी. पासून हे आन्दोलन शुरू आहे, आन्दोलनात विद्यार्थी उपस्थित असलेले रमेश भोसले, अमर तायडे, संदीप वाघमारे ,रावण समिंदर ,सुमित भिंगारदिवे, नरेंद्र शिरसाट, अशोक कांबळे ,आनंदराज घाडगे योगेश अहिरे, विकी शिंगारे यांचा लढा सुरूच आहे. महाड प्रशासन अजुनही जागे नहीं.
धनाजी गुरव हटाव, महाविद्यालय बचाव.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...